36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमंत्रालयअधिकारी महासंघाला लाज का वाटत नाही? सरकारी कर्मचारी संघटनेचा संताप

अधिकारी महासंघाला लाज का वाटत नाही? सरकारी कर्मचारी संघटनेचा संताप

दैनंदिन व्यवहारातील शासकीय पातळीवरील कामे करण्यासाठी सर्वसामान्यांना सरकार दरबारी खेटे घालावे लागतात. पण कित्येकदा टेबलाखालून देवाण-घेवाण केल्याशिवाय सरकारी कामे पूर्ण होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लाच घेण्यास सोकावलेल्या भ्रष्ट सरकारी बोक्यांना वेळीच वेसण घालणे गरजेचे असते. या प्रकरणांना पायबंद घालण्यासाठी अशा भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना व्यापक “प्रसिद्धी” दिली तरच इतरांना जरब बसेल. पण सरकारी अधिकाऱ्यांनीच आता “लाच घेताना एखाद्या सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला पकडण्यात आल्यावरही संबंधितांचे छायाचित्र आणि नाव प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊ नये,” अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे (Maharashtra Rajya Sarakari Karmachari Madhyavarti Mahasangh) मुख्य सचिव सुभाष गांगुर्डे (Subhash Gangurde) यांनी अधिकारी महासंघाला लाज का वाटत नाही? असा संतप्त सवाल करत या मागणीचा निषेध केला आहे. (Why is the officer’s federation not ashamed?)

याप्रकरणी अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र सादर केले आहे. सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक अथवा संबंधित विभागामार्फत त्याचे नाव आणि छायाचित्र प्रसिद्ध केले जाते. मात्र, या प्रकरणांतील सर्वच संशयित आरोपी दोषी सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयीन निवाड्यांची तपासणी केल्यानंतर उघडकीस आले आहे. कालांतराने हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी निर्दोष सुटल्यानंतर त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची समाजात नाहक बदनामी होते, असे या पात्रात म्हंटले आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपात पकडण्यात आलेल्या या आरोपींविरोधातील गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांचे नाव आणि फोटो प्रसारमाध्यमांमध्ये छापण्यात येऊ नयेत. याबाबतचे स्प्ष्ट आदेश सरकारने द्यावेत, अशी स्पष्ट मागणी अधिकारी महासंघाने केले आहे. या पत्रावर महासंचाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समिती भाटकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

यांची सार्वजनिकरित्या धिंड काढा!
गलेलठ्ठ पगार घेणारा सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी जर का लाच घेताना सापडला तर अशा भ्रष्टाचाऱ्यांचे थेट वार्तांकन करून त्यांची सार्वजनिकरित्या धिंड काढली पाहिजे, अशी जळजळीत प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे मुख्य सचिव सुभाष गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “सरकारी विभागातील अधिकारी लाच घेत असतील तर ती जनतेच्या पैशांची लूट आहे. लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी घालताना अधिकारी महासंघाला लाज नाही का वाटत? कित्येकदा तांत्रिक बाबींमुळे अशा भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका होते. सबळ पुरव्यांअभावी अशा लाचखोरांना सोडण्यात येते याचा अर्थ असा नाही की, ते धुतल्या तांदळासारखे असतात. तुम्हाला एखादी व्यक्ती लाच देत असेल तर त्याच वेळी तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार का करत नाही?

हे सुद्धा वाचा

चित्रा वाघ खुलासा करा, अन्यथा एकतर्फी कारवाई; राज्य महिला आयोगाची नोटीस

उर्फी जावेदच्या हातात अखेर बेड्या…

खात्रीने सांगतो महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येणार; केंद्रात ही सत्ता आणू : नाना पटोले

पोलीस सर्वात भ्रष्ट
लाचखोरांना जाळ्यात अडकविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) २०२२ मध्ये ७२७ सापळे रचण्यात आले होते. यावेळी १०३३ आरोपी जाळ्यात अडकले. तर २०२१ मध्ये ७६७ सापळे रचण्यात आले असून त्यामध्ये १०८१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. जानेवारी २०२२ पासून आतपर्यंत दाखल करण्यात गुन्ह्यांमध्ये एकूण ४२ सरकारी कर्मचारी दोषी सिद्ध झाले असून त्यांच्याकडून ७ लाख १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये महसूल, भूमिअभिलेख विभागाचे ११, पोलीस १४, महावितरणचे ५, समाजकल्याण विभागाचे ३ तर नगरविकास विभाग, पाटबंधारे, आरोग्य, शिक्षण, नगर परिषद, आदिवासी विकास, नगर रचना, वित्त धर्मादाय आयुक्त, सहकार व पणन या विभागातील प्रत्येकी १ आरोपीचा समावेश आहे. भ्रष्टचारात पोलीस आघाडीवर असून यामध्ये पोलीस खात्यातील सर्वाधिक म्हणजे १४ जणांविरुद्धचे आरोप सिद्ध झाले आहेत. यापैकी १९ सरकारी कर्मचाऱ्यांना अद्यापही बडतर्फ करण्यात आलेले नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे”.

पुणेकरांविरुद्ध सर्वाधिक तक्रारी
राज्यातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी “एसीबी”ने २०२२ मध्ये ७२७ सापळे रचले. यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या पुण्याचा प्रथम क्रमांक लागतो. “एसीबी”ने पुण्यात ६२ सापळे रचले होते. त्याखालोखाल औरंगाबादचा क्रमांक लागत असून त्याठिकाणी ५१ सापळे लावण्यात आले होते. नाशिकमध्ये ४७, मुंबईत ४२, ठाण्यात ३८ सापळे लावण्यात आले होते.

तुम्हाला काय वाटते… तुमचे मत व्यक्त करा!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी