25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीने हाती घेतले 'भगवे' राजकारण, आमदार रोहित पवारांचा पुढाकार

राष्ट्रवादीने हाती घेतले ‘भगवे’ राजकारण, आमदार रोहित पवारांचा पुढाकार

टीम लय भारी

अहमदनगर :  मराठ्यांच्या शेवटच्या ऐतिहासिक विजयी लढाईचा साक्षीदार असलेल्या अहमदनगरच्या खर्डा भुईकोट किल्ला परिसरात ७४ मीटर उंच ‘भगवा स्वराज्य ध्वज’ आमदार रोहित पवारांच्या माध्यमांतून लावला जाणार आहे(MLA Rohit Pawar will be hoisting Saffron Swarajya Dhwaj in the Kharda Bhuikot fort area).

रोहित पवारांच्या या घोषणेमुळे कर्जत – जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीने राज्यात ‘भगव्या’ राजकारणाला प्रारंभ केल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. मागील काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची सातत्याने पिछेहाट होत आहे. अगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे गणिते डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीने रणनिती आखण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी जनाधार वाढवण्याबरोबरच तुटलेला जनाधार पुन्हा जोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून नव्या खेळ्या खेळण्यास प्रारंभ झाला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीत ज्या भगव्या स्वराज्य ध्वजाची पताका हाती घेऊन बहूजन समाजाची वज्रमूठ बांधत अलौकिक शौर्य गाजवत स्वराज्य निर्माण केले होते त्याच स्वराज्य ध्वजाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आमदार रोहित पवार पर्यायाने राष्ट्रवादी सरसावली आहे. ऐरवी भगवा ध्वज म्हटलं की शिवसेना भाजप हे दोन पक्ष किंवा हिंदुत्ववादी संघटना नजरे समोर येतात. परंतु आता राष्ट्रवादीनेही भगव्या ध्वजाचे नवे राजकारण हाती घेतले आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेचे बहूजन समाजात काय पडसाद उमटणार याकडे सर्वांचे लक्ष असणार  आहे.

MLA Rohit Pawar : डोळ्यात पाणीच येणार, चिमुकलीने आमदार रोहित पवारांशी साधलेला संवाद नक्की ऐका

Rohit Pawar : रोहित पवारांची मतदारसंघासाठी ‘स्मार्ट’ योजना

MLA Rohit Pawar
‘भगवा स्वराज्य ध्वज’ आमदार रोहित पवारांच्या माध्यमांतून लावला जाणार

 

राष्ट्रवादीकडून पर्यायाने आमदार रोहित पवारांनी भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज साकारण्यासाठी मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेल्या खर्डा किल्ल्याची निवड करत महाराष्ट्राचे लक्ष खर्डा किल्ल्याकडे वेधले आहे. याशिवाय विखुरलेल्या मराठा समाजाला राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला आहे का ? अशी शंका आता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

काय आहे आमदार रोहित पवारांची योजना ?

Rohit Pawar : आ. रोहित पवारांकडून PM मोदींच्या ‘या’ निर्णयाच स्वागत, केली ‘ही’ विनंती

https://english.lokmat.com/photos/maharashtra/sharad-pawar-grand-daughter-mithila-pawar-wedding-pics-go-viral/

ऐतिहासिक खर्डा येथे भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याच्या आवारात आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून ७४ मीटर उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज उभारला जाणार आहे. हा भारतातील सर्वात उंच ध्वज असणार आहे. भगव्या स्वराज्य ध्वजाचं संत-महंतांच्या हस्ते नुकते पूजन करण्यात आलं आहे. आता पुढील दोन महिने हा ध्वज देशातील ७४ अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे. तिथं पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा करून १५ ऑक्टोबर रोजी तो मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत खर्ड्याच्या किल्ल्यात अभिमानाने फडकविण्यात येणार आहे.

रोहित पवारांची भूमिका काय ?

आमदार रोहित पवार म्हणाले की हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून तो सर्वांचा आहे. आणि या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे  हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणारच पण सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती याचं प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी