31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeसिनेमानवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित होणार 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट, नवी प्रदर्शन तारीख जाहीर

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित होणार ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट, नवी प्रदर्शन तारीख जाहीर

टीम लय भारी

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, आलिया भट अभिनित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचा ट्रेलर आल्या पासून चर्चेत होता. ३० जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. कोविड-१९ मुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर झाली आहे. गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट ६ जानेवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे (Gangubai Kathiawadi will be released on January 6, 2022). 

आता मुंबई नाही तर थेट लंडनपर्यंत ‘दे धक्का’, भाग दुसरा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तापसी पन्नुच्या नव्या प्रेरणादायी ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचा ट्रेलर एकदा पहाच

हा चित्रपट वास्तविक जीवनातील माफिया राणी गंगुबाईच्या कथेवर आधारित आहे. त्या १९६० च्या दशकातील मुंबईतल्या वेश्यागृह मालक म्हणून त्या काम करीत होत्या. या चित्रपटात आलिया भट गंगुबाईंची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये दिसलेल्या तिच्या अभिनयाने तर तिने हि भूमिका उत्तम साकारली आहे असे दिसून येते ((Alia Bhatt is playing the role of Gangubai in this film).

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी :

एस. हुसेन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. गंगूबाई गुजरातमधील कठियावाड येथील राहणारी होत्या. यामुळेच त्यांना गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखलं जाऊ लागले. कमी वयातच गंगूबाईला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. गंगूबाईचा मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वैश्याव्यवसाय चालत असे (Gangubai Kathiawadi was a resident of Kathiawar in Gujarat).

या पुस्तकात कुख्यात गुंड करीम लालाचा उल्लेख केला आहे. पुस्तकानुसार, करीम लालाच्या गँगमधील एकाने गंगूबाईवर बलात्कार केला होता. यानंतर न्याय मागण्यासाठी गंगूबाई करीमला भेटली आणि त्याला राखी बांधून भाऊ केले. करीम लालाची बहीण झाली म्हटल्यावर आपणंच तिचे कामाठीपुरामध्ये वजन वाढले असे म्हंटले जाते की, गंगूबाई कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरूद्ध कोठ्यावर काम करायला घ्यायची नाही.

Gangubai Kathiawadi will be released on January 6, 2022
आलीया भटने चित्रपटात साकारलेली गंगुबाई काठियावाडी यांची भूमिका

‘कोटा फॅक्टरी’ सिरीजचा सीझन २ झाला प्रदर्शित, जाणून घ्या कसा आहे सीझन २

Alia Bhatt drops release date of Gangubai Kathiawadi

दरम्यान, तिने शरीर विक्री करणाऱ्या महिलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. गंगूबाईचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. तिला अभिनेत्री व्हायचे होते. पण वयाच्या १६ व्या वर्षी तिला वडिलांच्या अकाउंटन्टशी प्रेम झाले आणि लग्न करून ती मुंबईत पळून आली. तिच्या नवऱ्यानेच तिला फक्त ५०० रुपयांसाठी कोठ्यावर विकले होते.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी