28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeसिनेमाश्रध्दा कपूरने लिहिलेले पत्र तुम्ही वाचले का?

श्रध्दा कपूरने लिहिलेले पत्र तुम्ही वाचले का?

 टीम लय भारी

मुंबई :  श्रद्धा कपूरने नुकताच सोशल मिडीयावर 50 मिलियन फॉलोवर्सचा आकडा पार केला असून आपल्या चाहत्यांना त्यांच्या या प्रेमासाठी धन्यवाद देताना आपल्या सोशल मिडियावर स्वहस्ताक्षरात तीन भाषांमध्ये पत्र लिहिले आहे.

श्रद्धा कपूरने आपल्या सोशल मीडियावर शेयर करताना लिहिले…

“माझ्या सर्व प्रिय, जेम्स, बाबूडी, फैन क्लब, आणि हितचिंतकांनो, तुम्ही प्रेमाने बनवलेल्या व्हिडीओ आणि पोस्ट मी पहिल्या आणि माझे मन भरून आले. मी तुमच्या सर्वांमुळे इथे आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम, असेच सुखी आणि आनंदी रहा. कृपया स्वत:ची काळजी घ्या आणि एकमेकांसोबत प्रेमाने रहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद! 50 मिलियन वेळा – श्रद्धा ”

श्रद्धा 50 मिलियनचा आकडा पार करणाऱ्या काही मोजक्या सेलिब्रिटींपैकी एक असण्याचे कारण हे देखील आहे कि ती आपल्या या प्रभावाचा उपयोग #LockdownZoos सारख्या सामाजिक चळवळींसाठी करते आणि चाहत्यांना वेळोवेळी आग्रह करते की त्यांनी देखील प्राण्यांना वाचवण्यासाठी शक्य तेवढी मदत करावी. एका अभिनेत्री असण्यासोबतच, एका पर्यावरण कार्यकर्त्याच्या रुपात, ती लाकडापासून बनवलेला टूथब्रश वापरणे, स्नानसाठी केवळ एक बालदीच पाणी वापरणे आदी गोष्टींचा अंगीकार करते. या गोष्टी तिला इतरांपासून वेगळं आणि विश्वासार्ह बनवतात.

समाज माध्यमांवरच्या तिची मत, तिच्या फीड इतक्या मनभावन असतात की कोणीही त्यापासून प्रेरित होऊ शकतो. या व्यतिरिक्त, अभिनेत्री वर्चुअल जगात, आपल्या मजेदार आणि वास्तविक आयुष्यात ती जशी आहे त्याचतऱ्हेने स्वत:ला सादर करण्यासाठी ओळखली जाते. तिची हीच गोष्ट चाहत्यांना अधिक आवडते आणि प्रेक्षकांसोबत असलेले तिचे नाते अधिक गहिरे आणि मजबूत बनवते.

समाजमाध्यमावरील श्रद्धाच्या फीड खूपच सौहार्दतापूर्ण असतात कारण त्यामध्ये फैशनपासून बीटीएस, चित्रपट, एनिमल कडल, पर्यावरण यावर नवनवीन अपडेट आणि जगभरात घडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेण्यापर्यंत सर्व काही असते. यावरून हे देखील कळते की एक व्यक्ति म्हणून श्रद्धा किती जागरूक आणि संवेदनशील आहे. श्रद्धा कपूर लवकरच रणबीर कपूरच्या सोबत लव रंजन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी