30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeसिनेमावाढदिवसानिमित्त मलायका अरोराचा महिलांना खास फिटनेसमंत्र

वाढदिवसानिमित्त मलायका अरोराचा महिलांना खास फिटनेसमंत्र

टीम लय भारी

मुंबई : बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री मुन्नी म्हणजे मलायका अरोरा हिचा 23 ऑगस्ट रोजी 47 वा वाढदिवस आहे. पन्नाशीच्या जवळ आलेली ही अभिनेत्री आजही अगदी चिरतरुण दिसते (Malaika Arora special fitness mantra for women).

जाणून घेऊया तिच्या तंदुरुस्त आरोग्याचा मंत्र

वयाच्या 47 व्या वर्षीही बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा सुंदर आणि तरुण दिसते. तिला डायटिंग अजिबात आवडत नाही. तिच्या मते, रूटीन फॉलो करणे, वेळेवर व योग्य आहार घेणे आणि परिश्रम करत आयुष्याची मजा घेत म्हणजेच हॉलिस्टिक जगणेच तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेसे आहे, असे ती नेहमी म्हणते.

…’हे’ बॉलीवूड कलाकर इंस्टाग्रामपासून राहतात दूर

शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सरमध्ये कमबॅक

फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत लाईमलाईट असलेली मलायका आता 47 वर्षांची झाली असल्यामुळे ती आता फिटनेसच्या बाबतीत जास्त चर्चेत आहे. तिच्या फिटनेसचे एकच गुपित आहे, ते म्हणजे तिच्या व्यायामातील सातत्य. कितीही व्यस्थ जीवन असले तरी स्वतःला तंदुरुस्त ठेवणे, हे ती महत्वाचे समजते (No matter how busy her life is, she finds it important to keep fit).

फिटनेस ही तिच्या आयुष्यातली प्राथमिकता आहे. प्रत्येकाने आपल्या फिटनेसवर लक्ष दिले पाहिजे. वय काहीही असो तंदुरुस्त रहाणे महत्त्वाचे आहे, असे तिचे म्हणणे आहे. योगा करणे शरीराला नेहमीच फायदेशीर ठरते. मलायका नेहमीच योगा करतानाचे तिचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत सामाजिक माध्यमांवर करत असते.

Malaika Arora special fitness mantra for women
45शी नंतर तंदुरुस्त राहून सुंदर आणि तरुण दिसणारी अभिनेत्री मलायका अरोरा

शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा; ‘या’ अर्जाला दिली मान्यता

Pics From Malaika Arora And Arjun Kapoor’s Date. See What They Posted

तिच्या मते, योगा आपल्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. पंचेचाळीशी नंतर लठ्ठपणा, हाडांच्या समस्या असणाऱ्या स्त्रियांसाठी फिटनेसच्या बाबतीत मलायका एक उत्तम उदाहरण आहे. वजन कमी केले म्हणजे सारे काही होत नाही. ते वजन कायम तसेच राहिले पाहिजे. दिवसभरातून फक्त महिलांनी 60 मिनिटे व्यायाम आणि ध्यानसाधना केली पाहिजे तसेच भरपूर पाणी प्यायले पाहिजे. पूर्ण दिवसभर व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. असे केल्यास शरीरात उर्जा कायम राहील, नाही तर मग महिलांच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो, हाडांची घनता कमी होऊ लागते, असे ती सांगते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी