33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसिनेमा‘इंडियन आयडॉल 12’ च्या ट्रॉफीवर पवनदीपने मारली बाजी

‘इंडियन आयडॉल 12’ च्या ट्रॉफीवर पवनदीपने मारली बाजी

टीम लय भारी

मुंबई : नुकताच  ‘इंडियन आयडल 12’ महाअंतिम सोहळा पार पडला. गायक पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता ठरला आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली आहे (Pawandeep Rajan won the Indian Idol 12 title).

पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडल 12’ चा विजेता ठरला. तर अरूणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली. पवनदीप राजन व अरूणिता हे दोघेही शोच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. अखेर चाहत्यांच्या मतांच्या आधारावर पवनदीपने बाजी मारली. ‘इंडियन आयडल 12’ ची चकाकती ट्राफी आणि 25 लाखांच्या धनादेश देऊन पवनदीपला गौरविण्यात आले.

मोगॅम्बो खुश हुआ म्हणत प्रशांत दामलेंनी व्यक्त केली सरकारवर नाराजी

शिल्पा शेट्टीचाही पतीसोबत सहभाग आहे का?; पोलीसांनी केली सहा तास चौकशी

असा रंगला ग्रेट ग्रँड फिनाले

जज सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्यासह आज इंडियन आयडल 12 चा 12 तासांचा ग्रेट ग्रँड फिनाले रंगला.

चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली. जावेद अली, मनोज मुंतशीर, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार परफॉर्मन्सही दिले (Many veterans also gave explosive performances in the Great Grand Finale).

Pawandeep Rajan won the Indian Idol 12 title
पवनदीप राजन

‘रूप नगर के चीते’ मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

What Arunita Kanjilal told Pawandeep Rajan after he won Indian Idol 12

या शोच्या माजी स्पर्धकांनीही एकापाठोपाठ एक दमदार परफॉर्मन्स दिले. प्रत्येकाने अनु मलिकसोबतही परफॉर्मन्स दिले. प्रत्येकजण गात असताना, अनु मलिक पियानो वाजवत होते. सगळेच कलाकार धमाल करताना दिसले़ सुखविंदर सिंह यांना मोहम्मद दानिशसोबत ‘लगन लागी’ हे गाणे सादर केले़ हिमेश रेशमियाने निहालसोबत परफॉर्म दिला. हिमेशने २ सर्वप्रथम ‘चलाओं ना नॅनो से बाण रें’ हे गाणे गायले. तर निहालने ‘तेरा चेहरा’ हे गाणे गायले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी