35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeसिनेमाशिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा; 'या' अर्जाला दिली मान्यता

शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा; ‘या’ अर्जाला दिली मान्यता

टीम लय भारी

मुंबई:- राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवण्यासाठी अटक करण्यात आली होती. त्यामुळे शिल्पा शिट्टीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता शिल्पा शेट्टीला थोडा दिलासा मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या अर्जात व्यक्त केलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराला मान्यता दिली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, अभिनेत्रीच्या गोपनीयतेच्या अधिकाराची बाब योग्य आहे आणि कोणत्याही व्यक्तीवर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येणाऱ्या समस्यांवर भाष्य करू शकत नाही (Shilpa Shetty got some relief from the Mumbai High Court).

राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रसार माध्यमात शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जात होते. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे व्यथित होऊन अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

इस्राईलच्या राष्ट्रगीताची धून चोरण्याच्या आरोपावरून अनु मलिक होतोय ट्रोल

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा भावुक…

Shilpa Shetty got some relief from Mumbai High Court
शिल्पा शेट्टी

मीडियाच्या स्वातंत्र्यावर विपरित परिणाम होईल

याआधी सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटले होते की, अभिनेत्रीविरोधात रिपोर्टिंग करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना रोखण्याचा आदेश जारी केल्याने प्रेसच्या स्वातंत्र्यावर विपरित परिणाम होईल, त्यामुळे न्यायालय ते थांबवू शकत नाहीत. मात्र, यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले.

Shilpa Shetty got some relief from Mumbai High Court
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

त्यांनी असेही म्हटले होते की, शिल्पा एक पब्लिक फिगर आहे, त्यामुळे तिच्याबद्दल जे लेख येत आहेत ते बदनामीकारक नाहीत. मात्र, गोपनीयतेच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने आता स्पष्ट केले आहे (Shilpa Shetty right to privacy cannot be ignored).

अंबानींची नजर सबवे वर

Don’t deserve a media trial, says Shilpa Shetty on husband Raj Kundra pornography case

गोपनीयतेचा अधिकार कायम

कोणतेही न्यायालय असे म्हणू शकत नाही की, एखादी व्यक्ती पब्लिक फिगर असल्याने त्यांना त्यांचा गोपनीयतेचा अधिकार मिळणार नाही. मुक्त बोलण्याचा अधिकार म्हणजे एखाद्याचा गोपनीयतेचा अधिकार संपवणे असा होत नाही. असे न्यायालयाने मत मांडले आहे.

Shilpa Shetty got some relief from Mumbai High Court
शिल्पा शेट्टी

न्यायालयाने असेही म्हटले आहे की, मीडियाच्या स्वातंत्र्यामुळे तपासासंदर्भातील अहवाल थांबवता येत नाही. शिल्पाच्या अर्जानंतर काही लेख आणि व्हिडीओ काढण्यात आले असले, तरी न्यायालय सर्व लेख काढू शकत नाही (Shilpa Shetty application after Some articles and videos have been removed).

शिल्पा शेट्टीचे निवेदन

राज कुंद्रा प्रकरणी शिल्पाने तिचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. शिल्पाने लिहिले होय, अलीकडचे काही दिवस आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप झाले आहेत. माध्यमांनी माझ्यावर बरेच अन्यायकारक आरोप केले आहेत. केवळ मीच नाही तर माझ्या कुटुंबाला ट्रोल केले जात आहे आणि आमच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मी अद्याप या प्रकरणावर टिप्पणी केली नव्हती आणि भविष्यात मी असे करणार नसल्याने कृपया अशा खोट्या गोष्टी पसरवू नका. मला एवढेच सांगायचे आहे की तपास अजून चालू आहे आणि माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

Shilpa Shetty got some relief from Mumbai High Court
शिल्पा शेट्टी

एक कुटुंब म्हणून, आम्ही सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. पण मला तुम्हाला पुन्हा विनंती करायची आहे, एक आई म्हणून, माझ्या मुलांच्या गोपनीयतेची काळजी घ्या आणि अर्ध्यवट माहितीसह टिप्पणी करू नका (Shilpa Shetty has released her statement).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी