35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजअंबानींची नजर सबवे वर

अंबानींची नजर सबवे वर

टीम लय भारी
मुकेश अंबानींनी (qsr) म्हणजेच क्विक सर्व्हिस रेस्तराँ या नव्या धंद्याकडे आपले लक्ष वळवले आहे. भारतातील सिंगल फूड चेन असलेल्या सबवे इन्क ची फ्रांचाईजी घेण्याचा विचार अंबानी यांनी केला आहे. (Subway to be taken over by ambani)

ग्रोसरी, एड-टेक, इ फार्मसी, पेमेंट्स, फॅशन आणि फर्निचर नंतर आता मुकेश अंबानी QSR व्यवसायाकडे पाहत आहेत. हा व्यवहार 20 ते 25 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 1,488 ते 1,860 कोटी रुपये इतका होऊ शकतो.

महाराष्ट्र हळहळला, 16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा आज पहाटे मृत्यू

Subway
अंबानींची नजर सबवे वर

रोहित पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर साधला निशाणा

सँडविच आणि सब बनवणार्या सबवे या कम्पनीचे मुख्यालय अमेरिकेतील कनेक्टिकत येथे आहे. ही कम्पनी भारतातील अनेक माध्यमांद्वारे फ्रांचाईजी देऊन सबवे चालवते. तसेच जगभरातून सबवे ची चेन मोठ्या प्रमाणात पसरली आहे. परंतु या व्यवहाराबाबत कम्पनी कडून काहीही माहिती मिळालेली नाही

ही चर्चा यशस्वी झाल्यास भारतातील जवळजवळ 600 सबवे स्टोर्स अंबानींना मिळतील. आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल.

सबवे सदृश अनेक रेस्टॉरंट भारतात आहेत, सबवेचा सामना मॅक्डोनाल्ड, डोमिनोज, स्टार बक्स, पिझ्झा हट आणि बर्गर किंग व त्यांच्या स्थानिक व्यवसायिकांसोबत असेल. 2017 मध्ये भारतातील सबवे ची फ्रांचायझी घेतलेल्या काही व्यावसायिकांनी एकत्र येऊन TA associats आणि chrys capital सारख्या आर्थिक गुंतवणूकदार यांच्याशी चर्चा केली होती. मात्र ही चर्चा निष्कर्षा पर्यंत पोहोचू शकली नाही.

इस्राईलच्या राष्ट्रगीताची धून चोरण्याच्या आरोपावरून अनु मलिक होतोय ट्रोल

Future of Indo-China talks

सबवेला एकाच भागीदारद्वारे भारतात आपला व्यवसाय वाढवायला आवडेल. आणि त्याचमुळे मुकेश अंबानी सबवेची फ्रांचायजी घेण्याचा विचार करत आहेत.

सबवे चा मालकी हक्क डॉकटर्स असोसिएट्स कडे राखीव आहे. डाबर चे प्रमोटर अमित बर्मन यांच्या लाईट बाईट फूड चाही यात समावेश आहे. डॉकटर्स असोसिएट्स प्रत्येक फ्रांचायझी कडून 8 टक्के रेव्हेन्यू घेते. डोमिनोज 21 टक्के शेयर सह मार्केट लीडर आहे. तर मॅक्डोनाल्ड 11 टक्के वर आहे. सबवे चा सध्याचा शेयर 6 टक्के असल्याचे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी