26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रएमपीएससीची 817 जागांची मागणी, महाविकास आघाडी सरकारने दिल्या फक्त इतक्या जागा...

एमपीएससीची 817 जागांची मागणी, महाविकास आघाडी सरकारने दिल्या फक्त इतक्या जागा…

टीम लय भारी

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बैठकीत एमपीएससीच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्वप्निलसारख्या एका होतकरू विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर महाविकास आघाडी सरकारला जाग आली आहे. या बैठकीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लवकरच नियुक्ती देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे (MPSC students were given relief by the Mahavikas Aghadi government).

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारला जाग आली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीच्या नियुक्तीबाबत बैठक घेतली आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज पार पडलेल्या बैठकीत एमपीएससीने 817 जागांची शिफारस केली होती त्याबाबत चर्चा झाली. मात्र, या बैठकीत एसईबीसी प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांना लवकरच नियुक्ती देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ही माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा, नियुक्ती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरवली बैठक

31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, या बैठकीत एमपीएससीने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाली आहे. तसेच एसईबीसीच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, असे सांगतानाच आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील असेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे (Dattatraya Bharane has also said that the vacancies of members will be filled by July 31).

एमपीएससीच्या 817 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. एसईबीसीच्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा दावा यावेळी दत्तात्रय भरणे यांनी केला. तसेच 31 जुलैपर्यंत एमपीएससी आयोगावर 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या बैठकीत 48 एसईबीसीसह 413 विद्यार्थ्यांना लवकरच नियुक्ती देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली आहे.

MPSC students given relief Mahavikas Aghadi government
एमपीएससी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पावसाचे आगमन; आनंदाच्या जागी दुःखाचे ढग

Mumbai: Man falls short by 0.5 mm to qualify as police sub-inspector, HC orders MPSC to remeasure height

त्याचबरोबर यूपीएससीच्या धर्तीवर राज्यात एमपीएससी च्या परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही आजच्या बैठकीत अजित पवार यांनी एमपीएससीला दिल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. 15 हजार 717 पदांच्या भरतीची प्रक्रियाही लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भरतीवर बंदी आणली होती. ही पदे भरण्यासाठी ती बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी