31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनसर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर, सिद्धार्थ शुक्ला पहिल्या, सलमान खान दुसऱ्या...

सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर, सिद्धार्थ शुक्ला पहिल्या, सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर?

टीम लय भारी

मुंबई : लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन ही बातमी संपूर्ण इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का होता. सिद्धार्थ शुक्लाचे निधन हृदयविकारच्या झटक्याने झाले. सिद्धार्थ शुक्लाचा फार मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या खासगी आयुष्यासह इतर गोष्टी या इंटरनेटवर सर्च केल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक सर्च केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींमधील सेलिब्रेटींच्या यादीत सिद्धार्थ शुक्ला हा पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे(Most searched celebrities List released).

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आहे. बिग बॉस, अंतिम यासारख्या अनेक कारणांमुळे सलमानचा या यादीत समावेश झाला आहे. त्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन, तर चौथ्या क्रमांकावर कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार याचा समावेश आहे.

IFFI : ‘गोदावरी’ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार

सलमान आणि आयुषच्या ‘अंतिम’ची जादू, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

तसेच पाचव्या क्रमांकावर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा समावेश आहे. पुनीत राजकुमार आणि दिलीप कुमार या दोघांचेही निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग त्यांच्याबद्दलची माहिती, तसेच काही जुन्या आठवणींसाठी या दोघांना सर्च करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यंदा या यादीत एका नवीन अभिनेत्याचाही समावेश झाला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यन खान हा चांगलाच चर्चेत आला होता.

रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच दिसणार एकत्र, लव रंजनच्या चित्रपटांत करणार काम

Sidharth Shukla To Dilip Kumar- 5 Most Searched Male Celebs Of 2021

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी