31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमुंबईठाण्यात दहीहंडी उत्सवात १३ गोविंदा जखमी

ठाण्यात दहीहंडी उत्सवात १३ गोविंदा जखमी

ठाणे जिल्ह्यासह मुंबई आणि परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लाखों रुपयांची बक्षिसे लावण्यात आलेलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकाचा उत्साह शिगेला पोहचत आहे. असे असताना ठाण्यात दहीहंडी फोडताना आतापर्यंत १३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांना तातडीच्या उपचारासाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिवसभर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील दहीहंडी उत्सव मंडळांना भेटी देऊन त्यांचा उत्साह वाढवत आहेत.

सकाळपासूनच गोविंदा पथकांमध्ये उत्साह असताना विविध सरकारी यंत्रणादेखील सज्ज आहेत. दरम्यान, ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ४ तर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे ९ जखमी गोविंद उपचार घेत आहेत. अशी माहिती ठाणे आपत्ती कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले गोविंदा

१) कु. अनिकेत अनिल मेंढकर (पू./वय- वर्षे/ राहणार- चिराग नगर, ठाणे.)
२) कु. अक्षय कडू ( पू./वय- २५ वर्षे )
३) कु. नरेंद्र धामनराव वाल्मिक ( पू./वय- वर्षे/ राहणार- मुलुंड पूर्व)
४) कु. पीयूष पी. लाला (पू /वय- १८ वर्षे/ राहणार- बी. आर. नगर, दिवा.)
५) कु. सोमनाथ सुभाष सूर्यवंशी (पू./वय- २७ वर्षे)
६) कु. केदार पवार (पू./वय- २८ वर्षे)
७) कु. गौरव विष्णू चौधरी (पू./वय- २० वर्षे)
8) चैतन्य हेमंत ढोबळे -21 वर्ष रा. कल्याण
9)आकाश जयचंत चव्हाण -20 वर्ष रा. दिघा

जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले गोविंदा
१)   अनिकेत खाडे (पु/२१ वर्ष, राहणार: कांजूर मार्ग) यांना पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
२) अर्चना खेरणार (स्त्री/ ३४ वर्ष मेघवाडी, जोगेश्वरी) यांना कमरेला दुखापत झाली आहे.
३)  राहुल केदार(पु /२९वर्ष, राहणार गोरेगाव) यांना मानेला किरकोळ दुखापत झाली आहे.
४) पृथ्वी पांचाळ (पु/२५ वर्ष, राहणार साईनाथ नगर, विरार) यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
हे सुद्धा वाचा
शाहरुख खानच्या ‘जवान’ने दुपारपर्यंत कमावले २० कोटी; पण….
दहिहंडीचा उत्साह सोशल मीडियावर; बाळगोपाळांची रिल्स व्हायरल 
दहीहंडीसोबत मुंबई, ठाण्यात पावसाचे आगमन!

ठाण्यातील दोन्ही रुग्णालयात ताण वाढला
दरम्यान, दहीहंडी उत्सवात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात 10, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात सात रूग्णशय्या (रुग्णांसाठी खाटा) आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 4 रूग्णशय्या आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच 16 उपनगरीय रूग्णालयातही एकूण 105 रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 5 ते 10 खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. याच्या उलट ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आधीच रुग्णसंख्या जास्त आहे. त्यामुळे जास्त जखमी गोविंदाला  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी