31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमुंबईअभिनेते गोविंदा यांनी घेतले त्रंबकराजाचे दर्शन

अभिनेते गोविंदा यांनी घेतले त्रंबकराजाचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात अभिनेता गोविंदा (Actor Govinda) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र स्वतः गोविंदा उत्तर मुंबई मतदार संघातून उमेदवारी करण्याची शक्यता आहे.त्याच प्राश्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी गोविंदा यांनी मंगळवारी त्रिंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन अभिषेक केला. त्यांच्यासोबत मुलगा यश आणि ज्येष्ठ बंधू कीर्ती देखील होते. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि अध्यक्ष नितीन जीवने, कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल आणि स्वप्निल शेलार यावेळी उपस्थित होते. (Actor Govinda visits Trimbakraja )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. खुद्द अभिनेता गोविंदा मुंबईतील उत्तर मुंबई मतदार संघातून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून त्यांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली आहे. गोविंदा प्रदीर्घकाळ राजकारणापासून अलिप्त होते. त्यानंतर त्यांनी निवडणुकीच् काळातच राजकारणात भाग घेतला आहे. त्यामुळे ते राज्याच्या राजकरणात चर्चेचा विषय बनत आहेत. गोविंदा यांनी अभिषेक केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला काय साकडे घातले हे मात्र समजू शकले नाही. अभिनेता गोविंदा मंदिरात दर्शनाला आल्याने अनेक भाविकांनी सेल्फी घेण्यासाठी त्यांना गराडा घातला होता. गोविंदा गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त होते. त्यानंतर त्यांनी निवडणुकीच् काळातच राजकारणात भाग घेतला आहे. त्यामुळे ते राज्याच्या राजकरणात सध्या चर्चेचा विषय बनत आहेत.

यापूर्वीही गोविंदाने लढवली होती निवडणूक
2004 मध्ये गोविंदाने काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. अभिनेता गोविंदा यांची ती निवडणूक राम नाईक यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेल्या उल्लेखामुळे वादग्रस्त ठरली होती. अभिनेता गोविंदा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांची मदत घेतल्याचा आरोप केला जातो. अभिनेता गोविंदा याने 2004 ची निवडणूक जिंकल्यानंतर राजकारणाला राम राम ठोकला होता.

लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी आज सकाळी ज्योतिर्लिंग त्रिंबकेश्वर (Trimbakeshwar Mandir) मंदिरात दर्शन घेतले . त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि अध्यक्ष नितीन जीवने, कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल आणि स्वप्निल शेलार यावेळी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी