35 C
Mumbai
Friday, November 17, 2023
घरमुंबईडॉक्टर नरेंद्र जाधव 'भीमभाष्य'मधून मांडतात बाबासाहेबांची गाथा

डॉक्टर नरेंद्र जाधव ‘भीमभाष्य’मधून मांडतात बाबासाहेबांची गाथा

भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे उद्धारक, राज्यघटनेचे शिल्पकार अशी साधारण ओळख असते. पण त्या पलीकडे  बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वात विविध पैलू होते. ते आपल्याकडे दृकश्राव्य माध्यमात प्रखरपणे मांडण्यात आलेले नाहीत. आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे तब्बल २५ पैलू ‘भीमभाष्य’ या ऑडियो व्हिजुअल पॉडकास्ट मालिकेतून प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. नरेन्द्र जाधव उलगडून दाखवत आहेत. प्रत्येकी साधारण २० मिनिटांचा एक, असे एकूण ५४ भाग असलेल्या या पॉडकास्ट महामालिकेच्या माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे विविध  पैलू उलगडून दाखविण्यात येणार आहेत. मराठी, हिन्दी आणि इंग्लिश अशा तीन भाषांमध्ये ही मालिका आहे.

१४ ऑक्टोबर २०२३ (धम्मचक्रप्रवर्तन दिन) रोजी सुरू झालेली ही पॉडकास्ट महामालिका प्रत्येक शनिवारी आणि रविवारी (सकाळी ११.३० वाजता) दाखविण्यात येत असून ती १४ एप्रिल २०२४ (डॉ. आंबेडकर जयंती) पर्यंत नियमितपणे चालेल. या मालिकेचे आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरः युगप्रवर्तक बहुआयामी प्रतिभावंत, अखंड ज्ञानमार्गी डॉ आंबेडकर, अर्थतज्ञ डॉ आंबेडकर, ईस्ट इंडिया कंपनीः प्रशासन व वित्तप्रणाली MA Thesis, कोलंबिया विश्वविद्यालय, न्यूयॉर्क, १९१५ असे चार भाग प्रसारित झाले आहेत.

भीमभाष्य ही प्रदीर्घ पॉडकास्ट महामालिका (लांबी सुमारे १८ तास- प्रत्येक भाषेमध्ये) अनेक खंड असलेल्या संदर्भ ग्रंथांप्रमाणे कायमस्वरुपी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. यू ट्युब चॅनलवर Dr Narendra Jadhav World इथे ही मालिका पाहता येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वात विविध पैलू होते. ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, मानववंश अभ्यासक, राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक, मानवमुक्तीचे खंदे पुरस्कर्ते, ग्रंथसंग्राहक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे पाठीराखे, इतिहास अभ्यासक होते.

बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत मोठ्या प्रमाणात विविध विषयांवर लिखाण केले आहे. हजारो भाषणे दिलेली आहेत. तत्कालीन प्रश्नांवर लिखाण केले आहे. बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व एका तासाच्या  चित्रपटात, वा एका पुस्तकात मावणारे नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील हे पैलू मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न नरेंद्र जाधव यांनी या पॉडकास्ट महामालिकेतून केला आहे.

हे सुद्धा वाचा 

गिरीश महाजनांच्या फोननंतरही जरांगेंचं उपोषण सुरूच
ऐन निवडणुकीत ‘संघा’वर वेब सीरिज
दसऱ्याला झाली तब्बल 650 किलो सोन्याची खरेदी!

बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे खंड सरकार प्रकाशित करत असते. त्याला चांगली मागणीही आहे. असे असताना छोट्या पुस्तिकेपासून मोठ्या ग्रंथातून त्यांचे चरित्र आले आहे. जगात त्यांचे साहित्य वाचले जाते.अशातच  हल्ली तरुण पिढी अभ्यासाशिवाय खास वाचन करत नाही. अशी ओरड होते. या तरुणांसह अशिक्षित माणसांना बाबासाहेब किती थोर होते, याचे आकलन व्हावे यासाठी ही पॉडकास्ट महामालिका तयार करण्यात आली आहे. प्रवासात ही मालिका आपल्याला पाहता येणार आहे. नव्हे तर या मालिकेतून नव्या पिढीला अथांग बाबासाहेब लवकर कळणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी