33 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमुंबईमुंबई सिनेट निवडणूक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब, आशीष शेलारांचा दावा.. पण चौकशीतून आले सत्य...

मुंबई सिनेट निवडणूक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब, आशीष शेलारांचा दावा.. पण चौकशीतून आले सत्य समोर!

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक मतदार नोंदणीत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात होता. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अँड आशिष शेलार यांनी याबाबत तक्रार केली होती. आता, याबाबत चौकशी समितीने अहवाल सादर केला असून त्यातून अनेक बाबींचा उलघडा झाला आहे. आशिष शेलार यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. ‘शिवसेना उबाठा गटाने केलेल्या घोटाळ्यावर अखेर चौकशी समितीने दिलेल्या अहवालात घोटाळा झाल्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच पुन्हा मतदार यादी तयार करा असे निर्देश विद्यापीठाला दिले,’ असे आशिष शेलार यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले.

बुधवारी, (25 ऑक्टोबर) आशीष शेलार यांनी ट्विटर च्या माध्यमातून यांची माहिती दिली. त्यांनी ट्विटर पोस्टमधून सांगितले, “सिनेट निवडणूक मतदार नोंदणीत उबाठा सेनेने केलेल्या घोटाळ्यावर अखेर चौकशी समितीने दिलेल्या अहवालात घोटाळा झाल्याचे शिक्कामोर्तब केले. पुन्हा मतदार यादी तयार करा असे निर्देश विद्यापीठाला दिले.”


ते पुढे म्हणाले, “यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे सगळे प्रकरण गंभीर आहे. एक आर्थिक घोटाळाही यामध्ये करण्यात आला आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, एकाच नंबर वरुन, एकाच बँक खात्यावरून नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. तेही विद्यापीठाच्या खात्यावर जमा न होता, ते कंत्राटदाराच्या खात्यात पैसे गेले आहेत. आम्ही त्याचेही पुरावे सादर केले आहेत.”

“त्यामुळे आता या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व सोबत या आर्थिक घोटाळ्यांचीही आयकर खात्यामार्फत सरकारने चौकशी करावी. उबाठाच्या घोटाळेबाजांचा अर्धा चेहरा उघड झाला, त्यांचा पुर्ण चेहरा उघड व्हावा! हे कसले वाघ हे तर महापालिके पासून विद्यापीठापर्यंत सर्वत्र घोटाळेबाज!!” असे व्यक्तव्य त्यांनी केले.

हे ही वाचा 

गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणावर काय बोलले होते? काँग्रेसच्या निशाण्यावर सदावर्ते

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गिरीश महाजनांच्या फोननंतरही जरांगेंचं उपोषण सुरूच

दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या चौकशी समितीने मात्र शेलार यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगितले आहे. मतदार यादी मधील 756 मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा निदर्शनास येत होती. असे असले तरी त्यातील प्रत्येक मतदार हा वेगळा असल्याचे समितीने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सादर केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचं स्पष्ट झाले आहे. सिनेट निवडणुकीची मतदार यादी नव्याने तयार करण्याचे काम सुरू करून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी