32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रगुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणावर काय बोलले होते? काँग्रेसच्या निशाण्यावर सदावर्ते

गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणावर काय बोलले होते? काँग्रेसच्या निशाण्यावर सदावर्ते

राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून वादाची ठिणगी पेटायला सुरूवात झाली आहे. मराठा समाज आता पेटून उठला आहे. (२९ ऑगस्ट) मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनास सुरूवात केली होती. आता ४० दिवस झाले असतील मात्र सरकार आपले ठोस पाऊल उचलत नाही. म्हणून आता मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरू केले आहे. दरम्यान, काही दिवसांआधी वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाबाबत बेताल वक्तव्य केले होते. यामुळे राजकारण ढवळून निघू लागले आहे. एसटी संपाच्या मुद्दयावरून सदावर्ते चर्चेत होते. आता देखील ते भाजपच्या बाजूने बोलत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत आता कॉंग्रेस पक्षाने मौन सोडले आहे.

राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण सुरू असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता गुणरत्ने सदावर्ते काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण म्हणजे शरद पवारांचे राजकारण आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सदावर्तेंवर टीका केली. यामुळे या आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. याआधी सदावर्तेंनी एसटी आंदोलकांच्या संपाच्या मुद्द्यावरुनही वक्तव्य केले होते. हेच अनुकरण आता सदावर्तेंनी सुरू असलेल्या मराठा आंदोलनात केले आहे. यावर आता सदावर्तेंनी काही वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. अशा आशयाचे वक्तव्य  केले होते. यावर आता कॉंग्रेसने गौप्यस्फोट सदावर्तेंवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा

गिरीश महाजनांच्या फोननंतरही जरांगेंचं उपोषण सुरूच

ऐन निवडणुकीत ‘संघा’वर वेब सीरिज

उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची तुलना हिटलर, मुसोलिनीशी; आगापिछा नसलेले लोकही धोकादायक

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण का टिकले नाही. सर्वोच्च न्यायालायत मराठा आरक्षणाविरोधात लढणारे कोण याचे सर्व संदर्भ सदावर्तेंना लागू होत आहेत. याबाबतचा गौप्यस्फोट कॉंग्रेसने केला आहे. ट्वीट करत कॉंग्रेसने २०२१ या वर्षात सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला माझा नेहमी विरोध असेल, असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर बीबीसी मराठीने बातमी केली होती. त्याच बातमीचा स्क्रीनशॉट काढून कॉंग्रेसने सदावर्तेंवर टीका केली.

काय म्हणाले कॉंग्रेस 

राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. अशा स्थितीत  सदावर्तेंनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या वक्तव्याबााबत कॉंग्रेसच्या हाती एक बातमी लागली आहे. यावर आता कॉंग्रेसने प्रतिक्रिया दिली.

मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढणाऱ्या कोण?

उत्तरः जयश्री पाटील

जयश्री पाटील कोणाच्या पत्नी आहेत?

उत्तरः गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे?

उत्तरः एका उपमुख्यमंत्र्यांचा

मराठा आरक्षणाचा छुपा मारेकरी कोण?

उत्तरः शहाणा असेल त्याला वरील तीन प्रश्नांच्या उत्तरातून बरोबर कळेल, असे ट्वीट करत कॉंग्रेसने सदावर्तेंवर निशाणा साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी