30 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
HomeमुंबईBJP : भाजपाला पोस्टरबाजी आली अंगलट ! पोस्टरवरील 'तो' शेतकरीच करतोय दिल्लीत...

BJP : भाजपाला पोस्टरबाजी आली अंगलट ! पोस्टरवरील ‘तो’ शेतकरीच करतोय दिल्लीत आंदोलन

टिम लय भारी

मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. परंतु त्यामध्ये तोडगा काही निघाला नाही. दुसरीकडे नवे कायदे शेतक-यांच्या हितासाठीच असल्याच्या भूमिकेवर भाजप (BJP) ठाम आहे. शेतकरी मेळावे घेण्याबरोबर आता भाजपकडून पंजाबमध्ये नव्या कायद्यांसंदर्भात जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यामध्ये हरप्रीत सिंग नावाच्या एका शेतक-याचा फोटो वापरण्यात आला आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे हरप्रीत सिंग आनंदी असल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. मात्र हेच हरप्रीत सिंग गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवर नव्या कायद्यांविरोधात आंदोलन करत असल्याचे समोर आलं आहे.

हरप्रीत पंजाबच्या होशियारपूरचे रहिवासी असून ते शेतकरी आहेत. मात्र शेतीसोबतच ते अभिनयदेखील करतात. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतक-यांना फायदे होत असल्याच्या जाहिरातीत भाजपनं आपला फोटो कोणत्याही परवानगीविना वापरला असल्याचा आक्षेप हरप्रीत यांनी नोंदवला. भाजपनं बेकायदेशीरपणे फोटो वापरल्याचा आरोप त्यांनी केला.

‘मी ६-७ वर्षांपूर्वी माझा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हाच फोटो भाजपनं जाहिरातीत वापरल्याचं मला काल काही मित्रांकडून समजलं. त्यांनी मला जाहिरातीचे फोटोदेखील पाठवले. मात्र माझा फोटो वापरण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आता लोक मला फोन करून भाजपचा पोस्टर बॉय म्हणत आहेत. पण मी भाजपचा पोस्टर बॉय नसून शेतक-यांचा पोस्टर बॉय आहे,’ असं हरप्रीत म्हणाले.

भाजपला पाठवणार नोटीस

भाजपनं संमतीशिवाय जाहिरातीत फोटो वापरल्यानं हरप्रीत यांनी नापसंती व्यक्ती केली. जाहिरातीत हरप्रीत नांगर हाती घेऊन उभे आहेत. त्यांच्या शेजारी हमीभावाबद्दलच्या शंका दूर करणारा तपशील देण्यात आला आहे. हरप्रीत आता भाजपच्या जाहिरातीसह स्वत:चा ओरिजनल फोटो भाजपला पाठवणार आहेत. यासोबत कायदेशीर नोटीसदेखील बजावण्यात येईल. भाजपनं हरप्रीत यांच्या फोटोसह नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगणा-या जाहिराती तयार केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी