28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईअबब ! नगरविकास विभागाचा १ हजार कोटीचा घोटाळा

अबब ! नगरविकास विभागाचा १ हजार कोटीचा घोटाळा

 

टीम लय भारी
मुंबई : भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी वांद्रे येथे निदर्शने केली. आरक्षित जागा हटवून त्या बिल्डरांना स्वाधीन केल्या जात असल्यामुळे ही निदर्शने केल्याचे समजते (BJP leader aashish shelar demonstrated about reserved land of bandra).

महाराष्ट्रात काही वर्षांपासून येणारे पूर, हे अनधिकृत बांधकामामुळे होतात अशी अनेकांची धारणा आहे. त्यात आरक्षित असलेल्या जागा बिल्डरांना देण्यात आल्या आहेत. वांद्रे पश्चिम येथील 22 भूखंडांचे आरक्षण बदलले. याचा निषेध करत भाजप नेते ऍड आशिष शेलार यांनी वांद्रे येथे महापालिका आणि राज्यसरकार विरोधात निदर्शने केली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना फोन; त्यानंतर झाली भेट

PVR थिएटरकडून लस घेतलेल्यांसाठी खुशखबर, मिळणार मोफत मूव्ही तिकीट

मुंबईचा विकास आराखडा मंजूर केला. हा आराखडा 2034 पर्यंत असून त्यासाठीच्या नियोजन समितीने मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांना उपलब्ध करून दिल्या आहेत. वांद्रे पश्चिम येथील बाई आवाबाई पेटिट ट्रस्ट च्या अखत्यारीत येणाऱ्या शाळा, मैदाने, महापालिका बाजार, वृद्धाश्रम आणि डीपी रोड यावरील आरक्षणे बदलण्यात आली.

BJP
निदर्शने

या प्रकरणात सुमारे 1 हजार कोटींइतक्या जमिनीवरचे आरक्षण हटवण्यात आले. याविषयी ऍड. आशिष शेलार यांनी हरकत नोंदवली. परंतु तरीही या हरकतीची दखल न घेता आरक्षणे रद्द केली.

या आंदोलनात नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, विधानसभा अध्यक्ष किशोर पूनवत आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी सहभागी होते. या भागात फार रहदारी असते. उचभ्रू समजल्या जाणाऱ्या या विभागात वाहतूक कोंडी होऊ शकते. अशा परिस्थितीत या जागा मोकळया राहायला हव्या.

पोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

In 6 years, Maharashtra forest dept taken physical possession of over 14,000 hectare of reserved mangrove land

याबाबत शेलार पुढे म्हणाले की, ‘राज्य सरकारचे पर्यावरण मंत्री पर्यावरण वाचवण्याच्या गप्पा मारत आहेत आणि दुसरीकडे मुंबई पालिकेला हाताशी धरून, आरक्षणे बदलून, मोकळ्या जागांचा गळा घोटला जात आहे.

आज पासून मुंबई वाचवा आंदोलन करून या जागा लोकांसमोर आणणार आहोत. असेही शेलार पुढे म्हणाले. त्याच बरोबर त्यांनी रद्द व बदलण्यात आलेल्या अरक्षणांची माहिती दिली आहे.

1) सीटीएस क्रमांकावर मसुदा डीपी 2034 नुसार वेंडिंग झोन आणि वृद्धाश्रम तसेच विद्यार्थी वसतिगृह असलेल्या महानगरपालिका बाजाराचे आरक्षण.
1101 B/26, 1584, 1585, 1586, 1587, 1588, 1591 4113.86 चौ.मी. पूर्णपणे हटवले आहे.

2) 9.15 मीटर रुंद डीपी रोड ड्राफ्ट डीपी 2034 नुसार सीटीएस 1609, 1610 पूर्णपणे हटवले आहे.

3) प्राथमिक / माध्यमिक शाळेचे आरक्षण सीटीएस क्रमांकावर मसुदा डीपी 2034 अनुसार 1604, 1593, 1594, 1595, 1576, 1575 रद्द केले आहे आणि इतरत्र स्थलांतरित केले आहे.

4) सीटीएस क्रमांकावर मसुदा डीपी 2034 नुसार खेळाच्या मैदानाचे आरक्षण. 1592, 1593, 1604, 1606, 1607, 1608, 1609, 1610, 1611 2195.36 चौरस मीटर क्षेत्रफळ हटवून इतरत्र स्थलांतरित केले आहे.

5) सीटीएस क्रमांकांवर मसुदा डीपी 2034 नुसार गार्डन / पार्कचे आरक्षण. 1478, 1480 1767.98 चौरस मीटर आकारमान हटवले आहे आणि इतरत्र स्थलांतरित केले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी