29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईलिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद

लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) मानाचा तोरा रोवला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा जगातील पहिलाच प्रयोग यशस्वी केला असून कोल्हापुरी चपलेस क्यू आर कोड दिला आहे. तसेच चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत एक छोटी चीप बसवली आहे. ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ही चप्पल कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती उललब्ध होणार असल्याने बनावट कोल्हापुरी चप्पल बनविण्या-याना चाप बसणार आहे. लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय मुंबई येथे आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच महामंडळाच्या कोल्हापूरी चपलांकरिता ब्लॉक चैन अंतर्गत क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) मानाचा तोरा रोवला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा जगातील पहिलाच प्रयोग यशस्वी केला असून कोल्हापुरी चपलेस क्यू आर कोड दिला आहे. तसेच चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत एक छोटी चीप बसवली आहे. ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ही चप्पल कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती उललब्ध होणार असल्याने बनावट कोल्हापुरी चप्पल बनविण्या-याना चाप बसणार आहे. लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय मुंबई येथे आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच महामंडळाच्या कोल्हापूरी चपलांकरिता ब्लॉक चैन अंतर्गत क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात आले असून त्याचे अनावरण राज्याचे मुख्य सचिव श्री. नितीन करीर यांच्या हस्ते करण्य्यात आले आहे, सदर प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून दि १ मार्च २०२४ पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरू राहणार आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्यातील २५ हजार युवकांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी यावेळी सांगून महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्यात.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचाच भाग म्हणून आज राज्यातील २५ हजार उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे. महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविल्या जात असल्याचे सागितले.

या कार्यक्रमास आमदार सरोज आहिरे, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संजय खामकर, हिदुस्थान ऑग्रो चे डॉ.भारत ढोकणे पाटील यांच्या आदि मान्यवर उपस्थित होते.
चर्मोद्योग व्यवसायवाढीसाठी लिडकॉम नेहमीच पुढाकार घेतला असून रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क व देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येणार आहे. राज्यात क्लस्टर धोरण असावे यासाठी लिडकॉमच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गजभिये यांनी प्रास्ताविकात नमूद केले
देवनार येथे लेदर पार्क, बेसलाईन सर्वेक्षण करण्यासाठी सीएलआरआय (CLRI) चेन्नई यांच्या समवेत सामंजस्य करार मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आला. तसेच महामंडळाच्या नवीन लोगोचे अनावरणही आणि एम.सी.ए.डी. मार्फत २५ हजार विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

बाजारात बोगस कोल्हापुरी चपलांचा सुळसुळाट वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी लिडकॉमने नवा प्रयोग राबवत कोल्हापुरी चपलांना ‘क्यू आर’ कोड दिला आहे. ग्राहकांना असली आणि चांगली कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. सदर तंत्रज्ञान इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीने बनवले आहे, त्यामुळे आता मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल असली की नकली… ओळखता आहे .चपलांमध्ये अशाप्रकारे जगात प्रथमच तंत्रज्ञान वापरले गेले आहे. उत्पादनापासून ते विक्रीपर्यत प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते. हा प्रयोग महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस, रबरच्या विक्रीमध्ये केला गेला आहे. त्याला चांगले यश मिळाले असल्याची माहिती इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक गौरव सोमवंशी सांगितले आहे .लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लिडकॉमच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी