31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्र बेचिराख करण्याचं कटकारस्थान केलंय का, आशिष शेलारांचा सवाल

महाराष्ट्र बेचिराख करण्याचं कटकारस्थान केलंय का, आशिष शेलारांचा सवाल

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जरांगेंच्या वक्तव्यांचा आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर निशाणा साधला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख असा उल्लेख केला होता. मनोज जरांगे पाटील जर असं वक्तव्य करत असतील तर काही तर कट रचला जात होता का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी केली आहे.

“महाराष्ट्र बेचिराख करण्याची कोणी भाषा करत असेल तर हे गंभीर आहे. बेचिराख करणार याचा अर्थ काही कट रचला जात होता का, मुंबई उच्च न्यायालय देखील बोलत आहे राज्य सरकारने गांभीर्याने घ्या. ज्या पद्धतीचे कटकारस्थान आणि महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेबद्दल सदनात बोलणार नाही तर कुठे बोलणार? ही फक्त धमकी आहे का? कटकारस्थान केलंय का? गांभीर्यानं घ्या”, असं न्यायालयानेही म्हटल्याचे शेलार यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा : जन्मऋणची विलक्षण कथा सांगण्यासाठी लेखिका, निर्माती दिग्दर्शक कांचन अधिकारी सज्ज

शेलार म्हणाले की, “जरांगेंच्या मागण्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. पण मराठा समाजाची बदनामी होतेय का, असा प्रश्न आहे. आम्ही मराठा समाजाचे मोर्चे काढले. इतर कुठल्याही समाजाला नख न लावला मराठा समाजाला आरक्षण आणि हित जपावं अशी मागणी होती. कायद्यात टिकेल ते आरक्षण मिळालंच पाहिजे. जरांगेंचा आदर करू पण ज्या पद्धतीची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल वापरली, एकेरी उल्लेख केला. कायदा सुव्यवस्था आणि भारतीय संविधाना पलिकडे देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात कधीच नसते. पण तुम्हाला निपटून टाकू असं वक्तव्य जरांगेंनी केलं आहे.”

हेही वाचा : Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं दीर्घ आजाराने निधन

“पंतप्रधानांना येऊ देणार नाही अशी भाषा केली. पंतप्रधानांना अडवणारे कोण? विरोधी पक्षनेतेही आमच्या भूमिकेत आमच्यासोबत राहतील असा विश्वास आहे. कट रचला जातोय याची चौकशी करायला हवी? महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कुणी केली? उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं ठीक, पण संपवून टाकू, निपटून टाकू अशा धमक्या देण्याची हिंमत कुठून आली”, असा प्रश्न शेलारांनी विचारला आहे.

हेही वाचा : Ajit Pawar Letter : “…आणि म्हणून मी वेगळी भूमिका घेतली”, अजित पवारांनी जनतेला लिहिलं खुलं पत्र

“घटनाक्रम सरळ नाहीय, देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी राऊत म्हणाले की एका दिवसात भाजपला संपवेन. दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील म्हणतात उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकेन. हे सहज आहे का? याच्यामागे कटकारस्थान आहे. जरांगेंनी जी भाषा वापरली त्याकडे एकवेळ दुर्लक्ष करू. देवेंद्रजी कधी आम्हाला बोलणार नाहीत. पण पंतप्रधान मोदींची सभा महाराष्ट्रात उधळून टाकू म्हणतात. कोण तुम्ही? आज सदनातून संदेश जायला हवा. पंतप्रधानांना सभा घेऊन देणार नाही याचा काय संबंध? योजना कशी तयार झाली? ह्या व्यक्तीला महत्त्व द्यायचं नाहीय”, असंही शेलार यांनी सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी