27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमुंबईसरकारी नोकरीची जम्बो सुवर्णसंधी; भारतीय डाक विभागात ९८ हजार जागा भरणार

सरकारी नोकरीची जम्बो सुवर्णसंधी; भारतीय डाक विभागात ९८ हजार जागा भरणार

करोनानांतर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. सरकारी तर सोडाच खासगी नोकरीही मिळणे दुरापस्त झाले होते. पण आता बेरोजगार तरूणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी भारतीय डाक विभागाने दिली आहे. भारतीय डाक विभागात (Indian Post Office) पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी तब्बल ९८ हजार ८३ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. डाक विभागाने आपल्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावर अधिक माहिती उपलब्ध आहे. (golden opportunity of government job; 98 thousand seats will be filled in the Indian dark department)
या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची तारीख आणि तो सादर करण्याची तारीख याबाबत डाक विभागामार्फत लवकरच अधिसूचना जरी करण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज भरावा असे आवाहन डाक विभागाने केले आहे.

  • पोस्टमन पदासाठी ५९ हजार ९९ जागा तर मेल गार्डच्या १४४४ जागा भरण्यात येणार आहेत. मल्टी टास्किंग पदासाठी २३ मंडळांमध्ये एकूण ३७ हजार ५३९ रिक्त जागा भरण्यात येतील. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे तर कमल वयोमर्यादा ३२ वर्षे ठेवण्यात आली आहे.

आवश्यक पात्रता १० वी आणि १० वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज सादर करू शकतात.

अर्ज असा करावा

  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
  • त्यानंतर ‘register now’ यावर क्लिक करा
  • आता तुमच्यासमोर एक नवीन टॅब उघडेल त्यावर नोंदणी करावी लागेल
  • नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांना आपली शैक्षणिक आणि इतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करवी लागतील.
  • ही सर्व कागदपत्रे आपोआड केल्यानंतर अर्जाचे शुल्क भरावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज दाखल करून त्याची प्रिंट घेता येईल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी