27 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्रमुंबई ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान एअर इंडियाची थेट विमानसेवा सुरु

मुंबई ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान एअर इंडियाची थेट विमानसेवा सुरु

मुंबई ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान एअर इंडियाने थेट विमानसेवा सुरु केली आहे. ही सेवा आठवड्यातील तीन दिवस उपलब्ध असेल. एअर इंडियाने आपल्या सेवेचा विस्तार केला आहे.

मुंबई ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान एअर इंडियाने थेट विमानसेवा सुरु केली आहे. ही सेवा आठवड्यातील तीन दिवस उपलब्ध असेल. एअर इंडियाने आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. (mumbai san francisco direct flight) एअर इंडियातर्फे आता मुंबई ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान थेट नॉन स्टॉप विमानसेवा सुरु केली आहे. १५ डिसेंबर पासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. एअर इंडियाने डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी २ डिसेंबर पासून बेंगळुरु ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान थेट विमानसेवा सुरु केली आहे. भारत- अमेरिका दरम्यान सातत्याने वाढत असलेल्या हवाई प्रवाशांची संख्या पाहून एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईला आंतरराष्ट्रीय हवाई सेवेत महत्त्वाचे स्थान मिळण्यासाठी एअर इंडियाने हे पाऊल उचलले आहे. मुंबई – न्युयॉर्क, मुंबई – फ्रॅंकफर्ट, मुंबई – पॅरिस अशा विविध सेवा एअर इंडियातर्फे चालवल्या जात आहेत. मुंबई विमानतळावरुन देशांतर्गत अधिक सेवा पुरवण्यासाठी एअर इंडिया आगामी काळात आणखी विमानसेवा सुरु करणार आहे.

हे सुध्दा वाचा

आंतरधर्मीय विवाहाला विरोध हाच विवाह समन्वय समितीचा उद्देश – हुसेन दलवाईंचा आरोप

चिनी सैनिक घुसखोरी करतात ते चुकीचेच पण, भारतीय सैनिक सुद्धा तेच करतात; भालचंद्र नेमाडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा राजीनामा; ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वरून सरकारचा निषेध

मुंबई ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यानची ही सेवा प्रत्येक आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी उपलब्ध राहील. नव्याने एअर इंडियाच्या ताफ्यात आलेल्या बोईंग ७७७-२०० एलआर विमानांचा या सेवेसाठी वापर केला जाणार आहे. या सेवेमुळे एअर इंडियाच्या भारत ते अमेरिका या दरम्यानची सेवा दर आठवड्याला ४० थेट विमान उड्डाणांवर पोचली आहे.

सध्या एअर इंडियातर्फे मुंबई ते नेवार्क, दिल्ली ते न्युयॉर्क, नेवार्क, वॉश्गिंटन डीसी, सॅन फ्रॅन्सिस्को व शिकागो, बेंगळुरु ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान हवाई उड्डाणे सुरु आहेत. मुंबई ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान सुरु झालेल्या या सेवेमुळे दिल्ली व बेंगळुरु पाठोपाठ मुंबई हे सॅन फ्रॅन्सिस्कोसाठी थेट सेवा पुरवलेले तिसरे शहर ठरले आहे. या मार्गावरील पहिल्या उड्डाणाप्रसंगी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, एअर इंडियाचे वित्त विभागाचे प्रमुख विनोद हेजमाडी उपस्थित होते.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, भारतासाठी व एअर इंडियासाठी ऐतिहासिक आहे. भारतातील हवाई वाहतूक क्षेत्र हे गेल्या १० वर्षात १०.६ टक्के वाढीसह जगातील तिसऱ्या क्रमाकांचे सातत्याने वाढणारे क्षेत्र ठरले आहे. एअर इंडियाचे यामध्ये मोठे योगदान आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला आणखी उंचीवर नेण्यात एअर इंडिया यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे, एअर इंडिया महाराष्ट्र व सॅन फॅन्सिस्को दरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. हवाई वाहतूक क्षेत्र अधिक विस्तारण्यासाठी सरकार गांभीर्याने प्रयत्न करत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!