27 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रजरांगे-पाटलांबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर....

जरांगे-पाटलांबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर….

मराठा आरक्षणाबाबत राज्यभर दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभांना लाखोंची गर्दी उसळत आहे. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, यासाठी ते आग्रही असल्याने ओबीसीमधील अनेक पक्षही याला विरोध करत आंदोलने करत आहे. मराठा समाजासाठी आरक्षण मागणाऱ्या जरांगे-पाटील यांची प्रतिमा निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जरांगे-पाटील यांच्या मदतीला धावले आहेत. ‘शासनाने जरांगे-पाटलांशी इमानदारीने बोलावे’, असे आंबेडकर यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आज (२१ ऑक्टोबर २०२३ रोजी) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर प्रथमच एका मंचावर आले होते. या कार्यक्रम स्थळातून बाहेर पडल्यावर माध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना गाठले. तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणबाबत मत व्यक्त केले.

‘शासनाने जरांगे-पाटलांशी इमानदारीने बोलावे. गेल्या 4 ते 5 महिने ते आपली भूमिका मांडत आहे. पण सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. गावात गेल्यावर परिस्थिती वेगळी असल्याचे लक्षात येते. मनोज जरांगेंनी मिळणाऱ्या पाठिंब्यात अनेकजण असे आहेत की, जे लग्न झालेले नाहीत किंवा ज्यांच्या हाताला काम नाही. सामाजिक परिस्थिती फारच गंभीर आहे. सरकारने  फसवाफसवीचे राजकारण थांबवावे, नाहीतर ते त्यांच्यावर उलटेल, जरांगे-पाटील जमीनदार आहेत. या समाजाच्या कौटुंबिक- वैयक्तीक समस्या आहेत.’ असेही आंबेडकर यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जरांगे-पाटील यांची विचारपूस केली होती.

हे सुद्धा वाचा 

शरद पवार-प्रकाश आंबेडकर भेटीत फक्त कॉफीपान?

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या ‘बारा’ भानगडी

‘इस्रो’नं पुन्हा करून दाखवलं, ‘गगनयान’ची पहिली चाचणी यशस्वी

उपमुख्यमंत्री पदही कंत्राटी पद्धतीने द्या: प्रकाश आंबेडकरांची फडणवीसांवर टीका 

‘कंत्राटी भरतीसंदर्भातील निर्णय धळूफेक करणारा आहे. यासंदर्भात मोर्चे निघत आहेत, आंदोलने  सुरू आहेत, उपमुख्यमंत्रिपदही कंत्राटी पद्धतीने  द्या, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी  सरकारवर टीका केली.

तर भाजपने वाट बघत बसावी 

‘आजच्या शरद पवार यांच्या भेटीत इंडिया आघाडीबद्दल काहीच बोलणे  झालेले  नाही. 5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही होईल, असेही वाटत नाही. तसेच, भाजपबाबत  बोलताना ते म्हणाले की, ‘भाजपाला असे  वाटत असेल की, आम्ही त्यांच्यासोबत येऊ तर मी म्हणेन की, वाट बघत बसा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी