31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeजागतिकइस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेने उचलले मदतीचे पाऊल

इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेने उचलले मदतीचे पाऊल

हमास आणि इस्रायल यांच्यात काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलविरोधात ५ हजार रॉकेट्सने हल्ला केला होता. यानंतर हमासने युद्ध मागे घेण्याची भुमिका अवलंबली होती. मात्र इस्रायलवर सुरू असलेल्या हल्ल्याने इस्रायलची दैनी अवस्था झाली आहे. यामुळे इस्रायल युद्ध मागे घेण्यासाठी तयार होत नाही. याच पार्श्वभूमीवर जगभरातून कोणी इस्रायलला पाठींबा देत आहे तर कोणी हमासला पाठींबा देत आहे. दरम्यान, अशातच आता इस्रायलला अमेरिकेचा पाठींबा आहे. सध्या गाझा येथून सतत हल्ले होत असल्याने इस्रायलाला सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे काम इस्रायल सरकार करत आहे. मात्र आता सुरक्षित ठिकाणी धोके निर्माण होऊ लागल्याने इस्रायलच्या मदतीला अमेरिकेने आपले पाऊल उचलले आहे.

हमास येथील ९०० वर्षे जुणी असलेली चर्च इस्रायलने पाडली आहे. यावेळी गाझामधून होणारे हल्ले हे इस्रायलसाठी मोठे आव्हान आहे. म्हणून आता अमेरिकेने इस्रायलवर होणाऱ्या हल्ल्यावर अंकुश लावण्याचे काम केले आहे. यावेळी अमेरिकेने आपल्या युद्धनौकांच्या मदतीने इस्रायलवर होणारी क्षेपणास्त्रे पाडली आहेत. अमेरिकेने केलेली मदत हि इस्रायलच्या संरक्षणासाठी उचललेले पाऊल आहे. इस्रायलवर होणाऱ्या या हल्ल्याचा विचार करता इस्रायल देशातील नागरीकांना सुरक्षित भागात घेऊन जात आहेत. मात्र सुरक्षित भागातही धोका निर्माण झाल्याचे समजत आहे.

हेही वाचा

शरद पवार-प्रकाश आंबेडकर भेटीत फक्त कॉफीपान?

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या ‘बारा’ भानगडी

मोहीत कंबोजने राखी सावंतसोबत केली सुषमा अंधारेंची तुलना

पाणी नाही, वीज नाही, हमास अंधारात 

तर दुसऱ्या बाजुला इजिप्तचा हमासला पाठींबा असून इजिप्त हमासला आवश्यक वस्तु पुरवत आहे. यामुळे हमासला दैनंदिन जीवनसाठी आवश्यक वस्तूंचा वापर करायला मिळत आहे. मात्र हमास येथील हॉस्पिटलची वाईट परिस्थीती झाली आहे. वीज नसल्याने रुग्ण आणि डॉक्टरांचे हाल होताना दिसत आहेत. यामुळे जनरेटरसाठी आवश्यक असलेले इंधन इजिप्त पुरवत आहे. डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोबाईल टॉर्चचा वापर करत आहेत. तर पिण्याच्या पाण्याची देखील योग्य सुविधा नाही. अशी युद्धजन्य परिस्थीती पहायला मिळत आहे. यावर आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मौन सोडले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लामुदीर पुतीन हे लोकशाही नष्ट करण्याच्या मार्गावर

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला पाठींबा देण्याबाबत वचन दिले आहे. या सुरु असलेल्या युद्धाचा संबंध बायडन यांनी थेट रशिया आणि युक्रेनशी जोडला आहे. हमासचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष व्लामुदीर पुतीन हे लोकशाही नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी