25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्र'समाजामध्ये मुघलांसारखी फुट पाडु नका,' प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांवर टीका

‘समाजामध्ये मुघलांसारखी फुट पाडु नका,’ प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांवर टीका

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारी, (14 ऑक्टोबर) झालेल्या मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली होती. मराठा आराक्षणाप्रश्नी घेण्यात आलेल्या या सभेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित झाले होते. यावेळी, सभेतील लोकांसमोर भाषण करत जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडवणीस यांना समज द्यावी, असे व्यक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते. त्यावरच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देत, ‘समाजामध्ये मुघलांसारखी फुट पाडु नका’ अशी सूचना केली आहे.

भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले, “मुघलांनी ज्याप्रकारे समाजात फूट पाडण्याचे काम केले तसे काम तुम्ही कॉंग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वात करू नका, मराठा आरक्षणाचा बाऊ करून समाजात फूट पाडण्याचे काम करू नका.”

“2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र उद्धव ठाकरे सरकारने न्यायालयात पाठपुरावा न केल्याने ते टिकले नाही. जरांगे यांचा आदर आहे. समाजासाठी आपण काम करत असल्याचेही मान्य आहे. पण ज्या पद्धतीने तुम्हाला चालविले जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो. मुघलांप्रमाणे समाजात फूट पाडू नका, आम्हा मराठा समाजाला आरक्षण हवे आहे,” लाड पुढे म्हणाले.

प्रसाद लाड यांची ट्विटर पोस्ट चर्चेत

प्रसाद लाड यांनी याबाबत ‘X’ वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेयर केली. त्यात त्यांनी जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देत व्हिडिओ पोस्ट केली. तसेच, मराठा आरक्षणाबाबतीत काही मुद्दे मांडले.

  • मराठा समाजाला १००% स्वतःच आरक्षण हवंय! जरांगे पाटील यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
  • मराठा आरक्षणाच्या आडून राज्याच्या राजकारणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.
  • कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देणाऱ्या मा. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याआधी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पहावेत.
  • बाबासाहेब भोसले, वसंत दादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांच्यासह आजवर झालेले मराठा मुख्यमंत्री समाजाला आरक्षण का देऊ शकले नाहीत? यावर कधी बोलणार आहात?
  • आरक्षण हा राजकारणापेक्षा मराठा समाजाच्या हिताचा विषय आहे, त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वात समाजात फूट पाडण्याचे काम करू नये!, ही विनंती आहे.
  • जरांगे पाटील यांचा आदर आहे, परंतु ज्या प्रकारे त्यांना भरकटवलं जातं आहे, त्या भरकटवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो.

हे ही वाचा 

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घ्यायला ‘सर्वोच्च’ होकार

जरांगेंचे फेसबुक पेज कोणी केले बंद?

जरांगेंचे राजकीय बॉस शरद पवार, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप

काय म्हणाले होते जरांगे पाटील?

जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरत सरकारला दिलेल्या 40 दिवासांच्या अल्टीमेटमला 10 दिवस बाकी असल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंचही मागे हटणार नाही. सरकारला ही शेवटची विनंती आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन केलेल्या समितीचे काम आता बंद करा. आधार घेऊन कायदा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. आता तर पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. मग याच आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा’, अशी मागणी जरांगे-पाटील त्यांनी केली.

“आज मराठ्यांचं आग्या मोहोळ शांत आहे, हे आग्या मोहोळ एकदा उठले तर आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,” असा इशारा जरांगे-पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला महाविराट सभेच्या माध्यमातून दिला. मराठा समाज गरीब आहे. शेती करून जगतो आणि देशालाही अन्नधान्य पुरवतो. तरीही मराठ्यांची लेकरे आरक्षणापासून वंचित आहेत. या पोरांना नोकरी लागली पाहिजे, ही मागणी आहे. म्हणून सरकारने तातडीने मराठा आरक्षण लागू करावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी