28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमनोरंजनBrahmastra : रिलीजआधीच 'ब्रह्मास्त्र'ची चलती, कमाईचे तोडले रेकाॅर्ड

Brahmastra : रिलीजआधीच ‘ब्रह्मास्त्र’ची चलती, कमाईचे तोडले रेकाॅर्ड

सिनेमाचं सगळ्यात जास्त बुकींग 3डीसाठी झालेले आहे, महाराष्ट्रात या सिनेमासाठी मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे, तर गुजरात आणि आजुबाजूच्या भागांत या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधूनच 27 ते 32 कोटी रुपये कमाई होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भटच्या ब्रह्मास्त्र सिनेमाचे सगळ्यांनाच वेध लागले आहेत. कधी हा सिनेमा पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या दरम्यान ब्रह्मास्त्र संदर्भात रोजच काहीतरी नवीन गोष्टी कानावर पडत आहेत. ब्रह्मास्त्रला बाॅयकाॅट करणाऱ्यांनी मध्यंतरी सिनेमाच्या विरोधात गळे काढायला सुरवात केली होती परंतु ब्रह्मास्त्र अॅडव्हान्स बुकींगने यांनी चांगलीच चपकार लगावली आहे. रिलीजआधीच ब्रह्मास्त्राने बाॅक्सऑफिसवर रेकाॅर्डब्रेक कमाई केली आहे. रिलीजआधीच्या या कमाईने ब्रह्मास्त्र हा अॅडव्हान्स बुकींगमध्ये जास्त कमाई करणारा सिनेमा ठरू शकतो. सध्या मोठमोठ्या कलाकारांच्या बीग बजेट सिनेमांकडे प्रेक्षक सपशेल पाठ फिरवत आहेत परंतु ब्रह्मास्त्रच्या बाबतीत नेमकं उलट होत असल्याचे दिसत आहे.

अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमाने रिलीज आधीच अॅडव्हान्स बुकींगचे रेकाॅर्ड तोडायला सुरवात केली आहे, त्यामुळे ३० कोटीं रुपयांच्या सुद्धा वर हा सिनेमाचे अॅडव्हानस बुकिंग होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रणबीर आणि आलियाच्या या सिनेमाचं बुधवारी रात्रीपर्यंत 18 कोटी रुपयांपर्यंत अॅडव्हान्स बुकींग झालं, त्यामुळे एका दिवसात सगळ्यात जास्त अॅडव्हान्स बुकींग झालेला हा पहिला सिनेमा ठरत आहे. बाहुबली, KFG 2 सारख्या बीगबजेट सिनेमांना सुद्धा ब्रह्मास्त्रने मागे टाकले आहे.

Brahmastra : रिलीजआधीच 'ब्रह्मास्त्र'ची चलती, कमाईचे तोडले रेकाॅर्ड

हे सुद्धा वाचा…

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांसाठी भन्नाट उपक्रम!

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

Beed Fraud News : संतापजनक! मयत व्यक्तीच्या खात्यातील पैसे बँकेने हडपले

या सिनेमाचं सगळ्यात जास्त बुकींग 3डीसाठी झालेले आहे, महाराष्ट्रात या सिनेमासाठी मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे, तर गुजरात आणि आजुबाजूच्या भागांत या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधूनच 27 ते 32 कोटी रुपये कमाई होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सिनेमाच्या रिलीजआधी निर्मात्यांकडून वारंवार प्रोमो प्रदर्शित करण्यात येत असल्याने प्रक्षकांची सुद्धा उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.

या सिनेमाच्या नव्या प्रोमोचा व्हिडिओ दिग्दर्शक अयान मुखर्जीने नुकताच शेअर केल्या त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नेटकी म्हणतात, प्रोमो रिलीज करण्याची उत्सुकता चांगलीच आहे पण प्रोमोमध्ये सगळच दाखवू नका की प्रेक्षक थिएटरमध्ये येणारच नाही. सिनेमासाठी थोडे तरी सीन्स ठेवा, सगळंच प्रोमोमध्ये दाखवू नका, असे म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी