28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईरक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने वाचवला भावाचा जीव; नवी मुंबईत अनोख्या पद्धतीचे रक्षाबंधन!

रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने वाचवला भावाचा जीव; नवी मुंबईत अनोख्या पद्धतीचे रक्षाबंधन!

नेत्वा धुरी, मुंबई: रक्षाबंधनानिमित्ताने उत्सवाचे वातावरण असताना नवी मुंबईत अनोख्या पद्धतीने भाऊ-बहिणीचा रक्षाबंधन साजरा झाला. ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या यकृताच्या आजाराने झगडणाऱ्या १७ वर्षांच्या भावासाठी त्याची बहीण धावून आली. आपल्या भावाला मरणयातनेतून वाचवण्यासाठी २१ वर्षांच्या बहिणीने त्याला आपल्या यकृताचा काही भाग दान करून नवे जीवनदान दिले.

राहुल पाटील (१७) याला अशक्तपणा आणि रक्ताच्या उलट्या होत होत्या. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेऊनही राहुलच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेरीस राहुलच्या कुटुंबीयांनी नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु केले. डॉक्टरांनी राहुलची वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीत राहुलला ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या यकृताच्या आजाराचे निदान झाले. राहुलला नव्या यकृताची गरज होती.

नवी मुंबईतील यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार,ऑटोइम्यून यकृत रोगामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या स्वतःच्या यकृताच्या पेशींविरुद्ध कार्य करण्यास सुरवात करते. आजाराचे लवकर निदान झाल्यास औषधांनी उपचार करता येतात. पण राहुलच्या आजाराचे निदान उशिरा झाल्याने त्याला वारंवार रक्तस्त्राव, ओटीपोटात द्रवपदार्थ जमा होणे, कावीळ यासारख्या गुंतागुंत होत्या. त्यामुळे त्याला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला.

डॉ राऊत पुढे म्हणाले,“रुग्णाच्या बहिणीने तिच्या आजारी भावाचा जीव वाचवण्यासाठी निर्भीडपणे तिचे यकृत दान केले. आम्ही यकृताचा आकार आणि यकृताची गुणवत्ता तपासली जी राहुलच्या आवश्यकतेशी पूर्णपणे जुळते. त्याच्यावर वेळीच उपचार न केल्याने त्याला जीव गमवावा लागला असता.”

ऑटोइम्यून यकृत रोगामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या स्वतःच्या यकृताच्या पेशींविरुद्ध कार्य करण्यास सुरवात करते. लवकर निदान झाल्यास औषधांनी उपचार करता येतात. राहुलच्या आजाराचे निदान उशिरा झाले आणि त्याला वारंवार रक्तस्त्राव, जलोदर (ओटीपोटात द्रवपदार्थ असामान्यपणे जमा होणे) आणि कावीळ यासारख्या गुंतागुंत होत्या. त्यामुळे त्याला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. वडील सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला असल्याने प्रत्यरोपणाची महागडी शस्त्रक्रिया परवडणारी नव्हती.

रुग्णालय आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी शस्त्रक्रियेच्या आर्थिक खर्चासाठी मदत केली. वैद्यकीय तपासणीत राहुलची बहीण नंदिनीचे यकृत त्याच्याशी जुळले. 26 जून रोजी नंदनीने आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी निस्वार्थपणे तिच्या यकृताचा महत्त्वपूर्ण भाग दान केला.

हे ही वाचा

रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकारची महिलांसाठी भेट; गॅस सिलिंडरच्या दरात घट

रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा योग, काही पणवती तर लागणार नाही ना?

रक्षाबंधन सणानिमित्त व्यापाऱ्यांकडून ‘केक’चे लाल गाजर !

अवयवदान हे एक शक्तिशाली  कार्य आहे.आम्ही प्रत्येकाला अवयवदाते होण्यासाठी आणि त्यांच्या प्रियजनांचे आणि गरजू लोकांचे जीवन वाचविण्यास मदत करण्यासाठी प्रोत्साहन देतो. या भावंडांची कहाणी रक्षाबंधनाच्या वेळी आनंद आणि उत्सव घेऊन येईल, अशी आशा डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी