25 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमुंबईसंजय राऊत म्हणाले, भाजपचे नेतेही शरद पवारांना भेटतात

संजय राऊत म्हणाले, भाजपचे नेतेही शरद पवारांना भेटतात

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानांना आपले नेते मानतात, तर भाजपचे नेतेही शरद पवारांना भेटायला जातात. महाराष्ट्रातील या राजकीय संस्कृतीतूनच मी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले ( Sanjay Raut said, BJP leaders meets to Sharad Pawar ).

खासदार संजय राऊत यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची ग्रँट हयात हॉटेल येथे भेट घेतली होती ( Sanjay Raut met to Devendra Fadnavis ). सुमारे दीड ते दोन तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. दोघांनी जेवणही एकत्र घेतले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना पुन्हा भाजपच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात तर नाही ना. मग महाविकास आघाडी सरकार पडणार तर नाही ना अशा चर्चेला उधाण आले आहे ( Uproar on Sanjay Raut and Devendra Fadanvis’ meeting ).

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेसोबत युती नाही

बाळासाहेब थोरातांनी ठणकावले : मोदी सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस संघर्ष करणार

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

खासदार संजय राऊत गेले काही महिने भाजप व त्यांच्या नेत्यांवर सतत तोफा डागत आहेत ( Sanjay Raut’s attack on BJP ). पण अचानक शिवसेनेने भाजपसोबत सुसंवादाची प्रक्रिया सुरू केल्याने अनेकांच्या पोटात धस्स झाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांनी आज सकाळी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांची ‘सामना’साठी मुलाखत घ्यायची आहे. ‘प्रेस क्लब’नेही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्याबाबत मला विचारणा केली आहे. त्या अनुषंगाने आपण देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे खासदार राऊत म्हणाले ( Sanjay Raut will take interview of Devendra Fadnavis ).

उत्तरेतील राज्यांमध्ये जी राजकीय संस्कृती आहे ती इथे नाही. इथले राजकीय नेते वैचारिक मतभेद विसरून एकमेकांना भेटत असतात

– संजय राऊत

शिवसेना व अकाली दल एनडीएचे चेहरे होते

शिवसेना व अकाली दल हे एनडीएमधील जुने घटक होते. हे दोन्ही पक्ष एनडीएचे मजबूत खांब होते. शिवसेनेला मजबुरीमुळे एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल सुद्धा एनडीएतून बाहेर पडल्याचे दुःख वाटते, अशी भावना खासदार राऊत यांनी यावेळी व्यक्त केली ( Sanjay Raut said, Shivsena and Akali Dal was strong pillar of NDA ).

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी