क्रीडा

नेमबाजीचे राष्ट्रीय चषक पुन्हा मध्य रेल्वेकडे

 पुणे येथे बालेवाडी स्टेडियममध्ये ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या रेल्वेच्या ५५ व्या ऑल इंडिया चॅम्पियनशीप स्पर्धेत मध्य रेल्वे तर्फे मुंबईची आंतरराष्ट्रीय नेमबाज रुचिरा अरुण लावंड हिला ५० मीटर प्रोन या क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण पदकं मिळाली आहेत. 

टीम लय भारी

मुंबई : पुणे येथे बालेवाडी स्टेडियममध्ये ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या रेल्वेच्या ५५ व्या ऑल इंडिया चॅम्पियनशीप स्पर्धेत मध्य रेल्वे तर्फे मुंबईची आंतरराष्ट्रीय नेमबाज (National Shooting Cup) रुचिरा अरुण लावंड हिला ५० मीटर प्रोन या क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण पदकं मिळाली आहेत.  रुचिरा ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल येते मुख्य कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत असून तिला महाराष्ट्र शासने शिव छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. (National Shooting Cup again at Central Railway)

नेमबाजीचे राष्ट्रीय चषक पुन्हा मध्य रेल्वेकडे

भारतीय रेल्वेच्या वतीने देशभरात विविध ठिकाणी ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे असे एकूण १४ संघ सहभागी होते. यावेळी सलग सातव्यांदा मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी बाजी मारत सर्वात जास्त पदके मिळवून या स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. मध्य रेल्वेने ३५ गुण मिळवून आपलं नाव चॅम्पियनशीप ट्रॉफीवर कोरलं. तर पश्चिम रेल्वेने १९ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी विशेष कौतुक केले आहे.(National Shooting Cup again at Central Railway)


हे सुद्धा वाचा : 

भाजप आमदाराविरोधात बातमी लिहिणाऱ्या पत्रकारांना मध्य प्रदेशातील पोलिसांनी केले विवस्त्र, अन् फोटो केला व्हायरल

आयएनएस ‘विक्रांत’चे पैसे गेले कुठे, याचे भाजपाने उत्तर द्यावे : नाना पटोले

..अन् “अरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे” म्हणत वसंत मोरे यांनी नवीन शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं केलं अभिनंदन

 

 

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close