36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीय..अन् "अरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे" म्हणत वसंत मोरे...

..अन् “अरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे” म्हणत वसंत मोरे यांनी नवीन शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं केलं अभिनंदन

टीम लय भारी 

मुंबई :यंदाच्या गु़ढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवर असणारे भोंगे न उतरवल्यास त्याचठिकाणी लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालिसा लावा, असे आदेश मनसैनिकांनी देण्यात आले. मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेला पुण्यातील मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी विरोध दर्शवला होता. दरम्यान, वसंत मोरे यांची पुण्याच्या मनसे शहराध्यक्ष यांची पदावरून हाकलपट्टी करण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!खूप खूप अभिनंदन साई!, असे सूचक ट्वीट वसंत मोरे यांनी केले आहे. (MNS Vasant More congratulated the new city president Sainath Babar)

त्याच दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना तातडीने शिवतीर्थावर येण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याचवेळी राज ठाकरे यांनी शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांना बोलावले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात वसंत मोरे यांनी भोंग्यांविरोधात भूमिका घेऊन नेतृत्त्वाची नाराजी ओढवून घेतल्याची चर्चा सुरु आहे.

वसंत मोरेंची विरोधी भूमिका

गुढीपाडवा मेळाव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणावर वसंत मोरे यांनी विरोध दर्शवत भूमिका मांडली आहे. वसंत मोरे यांनी मी माझ्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.(MNS Vasant More congratulated the new city president Sainath Babar)


हे सुद्धा वाचा : 

MNS vs SS : मनसेने जे केले ते उघडपणे केले; शिवसेनेसारखे लग्न एकाबरोबर अन् लफडं दुस-यासोबत केले नाही! संदीप देशपांडे यांचे अनिल परबांना प्रत्युत्तर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी