29 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरराष्ट्रीयअनंतनाग दहशतवादी हल्ल्यातील शहीद मेजर आशीष धोंचक यांना अखेरचा निरोप देताना गहिवरला...

अनंतनाग दहशतवादी हल्ल्यातील शहीद मेजर आशीष धोंचक यांना अखेरचा निरोप देताना गहिवरला संपूर्ण देश

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.अनंतनागमधील कोकरनागच्या गडोले जंगलात बुधवारी (13 सप्टेंबर) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशीष धोंचक, पोलीस उपअधीक्षक हुमायून मुजम्मील भट्ट आणि एक लष्करी जवान हे चार सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले. लष्कर ऐ तोयबा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

शहीद मेजर आशिष धोंचक यांना अंतिम निरोप

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत शहीद झालेले मेजर आशिष धोंचक यांचे पार्थिव आज शुक्रवार (15 सप्टेंबर) पानिपत येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या विडिओजमध्ये सैनिक कॉफीनमध्ये मेजर धोंचक यांचे पार्थिव शरीर घरी आणताना दिसले. या क्लिपमध्ये मेजर धोनचक यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमलेले दिसतात.

मेजर आशिष धोंचक हे एका अडीच वर्षांच्या मुलीचे वडील होते. मेजर धोंचक दोन महिन्यांपूर्वीच रजेवर घरी आले होते. बुधवारी सायंकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी स्थानिकांपर्यंत पोहोचताच त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली.

हे ही वाचा 

सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यालयासमोर तुम्ही गेलात तर तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल

निलम गोऱ्हेंनी लिहीले आत्मचरित्र; चळवळीतील कार्यकर्त्या ते विधान परिषदेच्या उपसभापती!

भाजपाच्या मर्जीतल्या अश्विनी जोशी झाल्या मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त

दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानची प्रतिक्रिया

दरम्यान, या दहशतवादी हल्याबबत पाकिस्तानचे वक्तव्य समोर आले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की, “जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग हल्ल्याचा अहवाल आमच्या लोकांनी पाहिला आहे. आम्ही आधीही म्हटलं होतं की, पाकिस्तानला देशांतर्गत राजकारणात ओढण्याची भारताची नेहमीच सवय आहे. भविष्यात भारताने पुन्हा असेच काम केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी