29 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरमहाराष्ट्रसुधीर मुनगंटीवारांच्या कार्यालयासमोर तुम्ही गेलात तर तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल

सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यालयासमोर तुम्ही गेलात तर तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्य मंत्रीमंडळातील एक महत्वाचे मंत्री आहेत. धडाकेबाज निर्णय घेण्यात ते अग्रेसर असतात. अशाच या मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आपल्या कार्यालयाबाहेर शिवरायांची जगदंबा तलवार आणि अफजल खान याचा कोथळा काढलेले वाघनखे ठेवली आहेत. त्यांच्या कार्यालयाजवळून जाणारे अनेक जण या प्राचीन वस्तू पाहिल्याशिवाय पुढे जातच नाहीत. नव्हे तर वनमंत्री यांचे हे कार्यालय पर्यटन स्थळच झालेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार आणि अफजल खान याचा कोथळा काढलेले वाघनखे सध्या ब्रिटिश
म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली आहेत. या प्राचीन वस्तू आपल्याला मिळाव्यात यासाठी मुनगंटीवार आग्रही आहेत. या वस्तू राज्यात परत याव्यात यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. त्याला यश मिळत असताना या वस्तू कशा होत्या?  त्यांचे महत्व काय आहे?  हे जनतेला कळावे यासाठी मुनगंटीवार यांनी या वस्तूच्या प्रतिकृती तयार करून घेतलेल्या आहेत. त्या सध्या मुनगंटीवार यांच्या कार्यालयाबाहेर ठेवण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा 

गणेशोत्सव 2023: पालिकेचा दणका मूर्तीविक्रेत्यांना! केल्या ५०० पीओपी गणेशमूर्ती जप्त..

गणेशोत्सव 2023: शेजारी राज्यांना ‘या’ जिल्ह्यातील मूर्तिकार पाठवत आहेत दीड लाख गणेश मूर्ती

Ias अधिकाऱ्याने सामान्य जनतेला मिळवून दिले ८३० कोटी

शिवाय शिवाजी महाराज यांच्या आज्ञापत्राची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. या वस्तूमधून शिवराय यांचे कर्तृत्व तर अधोरेखित होत आहे. तसेच शिवाजी महाराज यांचा पराक्रम, गनिमीकावा, प्रजेबद्दलची आपुलकी व्यक्त होत आहे.
वनमंत्री मुनगंटीवार यांनी ही संकल्पना पुरातत्व विभगाचे संचालक तेजस गर्गे यांना सांगताच, त्यांनी शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार आणि वाघनखे यांच्या प्रतिकृती तयार करून दिल्या. या प्रतिकृती पाहताना शिवाजी महाराज यांचे जाज्वल्य कर्तृत्व नजरेस भरते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी