25 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरराजकीयनिलम गोऱ्हेंनी लिहीले आत्मचरित्र; चळवळीतील कार्यकर्त्या ते विधान परिषदेच्या उपसभापती!

निलम गोऱ्हेंनी लिहीले आत्मचरित्र; चळवळीतील कार्यकर्त्या ते विधान परिषदेच्या उपसभापती!

चळवळीतील एका साध्या कार्यकर्त्या महिलेपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती पदापर्यंत डॉ. निलम गोऱ्हे यांचा आजवरचा सामाजिक, राजकीय प्रवास आहे. सुरुवातीच्या काळात युवक क्रांती दल, भारिप बहुजन महासंघ, शिवसेना असा मोठा सामाजिक, राजकीयपटावर त्यांनी आजवर नेतृत्व केले आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाला तशी मोठी प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आजवरचा त्यांचा जीवनपट आता पुस्तक रुपात आला असून, ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

महाराष्ट्रात 70 ते 80 च्या दशकात महिला अत्याचाराविरधातील लढे, समाजवादी चळवळ, दलित चळवळींच्या माध्यमातू सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात निलम गोऱ्हे यांनी काम करायला सुरुवात केली. सुरुवातील समाजवादी चळवळीशी संबंधित असलेल्या युवक क्रांती दलात त्या कार्यकर्त्या म्हणून सहभागी झाल्या. महिला अत्याचार असोत की सामाजिक सांस्कृतिक लढे निलमताई या लढ्यात अग्रभागी असत. युवक क्रांती दलातून निलम गोऱ्हे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. दलित चळवळीत देखील त्यांनी काम केले.

स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी महिला अत्याचारावरील प्रश्नांना वाचा फोडली. पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची महिला आघाडी, प्रवक्त्या, विधान परिषद आमदार, विधान परिषदेच्या उपसभापती असा त्यांचा आजवरचा प्रवास. शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आजवरचा हा सगळा सामाजिक राजकीय पट त्याच्यां पुस्तकात वाचायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा 
भाजपाच्या मर्जीतल्या अश्विनी जोशी झाल्या मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त
एकाचा मृत्यू होवून सुद्धा वेश्या व्यवसाय, ड्रग्जचा व्यापार सुरुच
सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यालयासमोर तुम्ही गेलात तर तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल

बुधवारी (दि. 13) रोजी मुंबईत राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थतीत ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, शब्दांकनकार करुणा गोखले आदी उपस्थित होते.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे या राजकारणातील प्रतिभावंत व सुसंस्कृत व्यक्ती असून त्यांचे जीवन संघर्ष व समाजकारणाची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाज कार्याने अमीट ठसा उमटवला आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकर‍िता त्यांचे जीवन-कार्य मार्गदर्शक आहे, असे उदगार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी