27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयमुलाला सेट करायचं आहे आणि जावयाला भेट करायचं आहे, भाजप खासदाराची ...

मुलाला सेट करायचं आहे आणि जावयाला भेट करायचं आहे, भाजप खासदाराची जळजळीत टीका

मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधानांना बोलते करण्याची खेळी आखून विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या अविश्वास प्रस्तावावर बोलताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह विरोधी नित्यांवर त्यांनी सडकून टीका केली.

हा अविश्वास आणला आहे, तो का आणला आहे? असा सवाल उपस्थित करत निशिकांत दुबे म्हणाले, सोनिया गांधी ज्या येथे बसल्या आहेत. मला वाटते, त्यांना दोन कामे करायची आहेत. एक आपल्या मुलाला सेट करायचे आहे आणि जावयाला भेट करायचे आहे. हाच या प्रस्तावाचा आधार आहे. जो अविश्वास प्रस्ताव पंतप्रधानांच्या विरोधात आणला आहे. ते पंतप्रधान गरीब घरातून आले आहेत. ज्यांनी गरिबांसाठी घरे, शौचालये आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे लोकसभेत सत्तारुढ पक्षाविरोधात आणलेला अवि्श्वास प्रस्ताव विफल होणे निश्चित आहे.

निशिकांत दुबे म्हणाले, आम्हाला वाटले अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी बोलतील, पण कदाचीत ते उशीरा उठले असतील त्यामुळे ते बोलू शकले नाहीत. दुबे यांनी राहुल गांधी यांच्या मोदी आडनाव बदनामी प्रकरणावर देखील यावेळी टीपण्णी केली. ते म्हणाले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निकाल दिलेला नाही, शिक्षेला स्थगितीचा आदेश दिलेला आहे. राहुल गांधी म्हणतात मी माफी मागणार नाही, तसेच ते म्हणतात मी सावरकर नाही. तुम्ही कधीच सावरकर होऊ शकत नाही असे दुबे म्हणाले.

यावेळी निशिकांत दुबे यांनी इंडिया आघाडीवर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले, जे पक्ष एकमेकांविरोधात लढले त्यांनी आज इंडिया आघाडी काढली आहे. काँग्रेसनेच लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवले. शेख अब्दुल्लांना काँग्रेसने २२ वर्षे तुरुंगात ठेवले. मुलायमसिंह यादवांविरोधात सीबीआयच्या केसेस आम्ही केल्या नव्हत्या. शरद पवार यांचे 1980 मधील सरकार काँग्रेसनेच बर्खास्त केले. काँग्रेसमधून वैतागून शरद पवारांनी बाहेर पडत नवा पक्ष स्थापन केला.

हे सुद्धा वाचा 
इंदुरीकर महाराजांना पुत्रप्राप्तीसंदर्भातील ‘ते’ विधान भोवणार; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

IIT मध्ये निवड झालेल्या हंसिकाने प्रियकरासोबत किडनॅपिंगचा केला बनाव; वडिलांकडे मागितली 10 लाखांची खंडणी

पेशवे हे दुष्ट, नीच प्रवृत्तीचे होते; भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य, समाज माध्यमात नेमाडे यांच्यावर टीका

सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना भाजपवर टीका केली होती. राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हटले होते. आता त्याच पक्षातील लोक तुमच्यासोबत आहेत अशी टीका केली होती. आज दुबे बोलताना म्हणाले. पंतप्रधानांनी आमच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला नॅ्चरली करप्ट पार्टी म्हटले होते. मात्र 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच केली होती, अशी टीका दुबे यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी