27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयकोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी विजय दर्डा व देवेंद्र दर्डा यांना चार वर्षे तुरुंगवासाची...

कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी विजय दर्डा व देवेंद्र दर्डा यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्ली सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलागा छत्तीसगडमधील कोळसा खाणीच्या वाटपाच्या अनियमिततेच्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यांच्यासोबतच माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया यांना तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आज (दि.२६) रोजी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.

युपीए सरकारच्या काळात देशभर गाजलेल्या कोळसा खाणी घोटाळाप्रकरणी सीबीआयने तपास केला, यामध्ये माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, जेएलडी कंपनीचे संचालक मनोज जयस्वाल यांच्यासह ७ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज दर्डा पितापुत्रासह तीन सनदी अधिकाऱ्यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

हे सुद्धा वाचा 

शिंदे सरकारचा सेवानिवृत्त पत्रकारांसाठी मोठा निर्णय; पेन्शनमध्ये होणार भरघोस वाढ

दलित पॅथरने आम्हाला काय दिले…….

…पण डोळ्यांना ते कधी जमलचं नाही; रिंकू राजगुरुच्या शायरीने चाहते घायाळ

गैर मार्गाने कंत्राट मिळवल्याचा आरोप विजय दर्डा आणि इतर आरोपींवर होता. कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने सन २०१२ मध्ये क्लोजर रिपोर्ट दिला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. दरम्यान गेली नऊ वर्षे आम्ही न्यायालयाचे हेलपाटे मारत असून आम्ही आधीच वेदना भोगत असल्याचे सांगत शिक्षेचा कालावधी कमी करण्याचा युक्तीवाद दर्डा यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी