29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeजागतिकखळबळजनक : चीनने भारताच्या सीमेवर वसवली ६२४ गावे !

खळबळजनक : चीनने भारताच्या सीमेवर वसवली ६२४ गावे !

टीम लय भारी

भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत- चीन सीमेवर चीननं सुमारे ६२४ गावं वसवल्याचं समोर येतंय. ही माहिती खुद चीन सरकारच्या सरकारी वेबसाईटतिबेट डॉट सीएनने सोशल मीडियावर प्रसारीत केली आहे. या अशा घटनांमुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी सीमेवर चिनी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले होते.अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, चीनकडून अरुणाचल प्रदेशाच्या भारतीय सीमेनजिक काही गावं उभारलेली आहे.

या गावांचा फायदा चीनला होणार आहे. ही गावं ज्या ठिकाणी वसवण्यात आली आहे तो अतिशय दुर्गम भाग आहे. चीनने या ६२४ गावांत वीज, पानी, पक्के रस्ते, मेडिकल सुविधा आणि रुग्णालये तसंच इंटरनेट ब्रॉडबॅन्डची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीय. या प्रकरणावर सध्या भारताकडून कोणतीही प्रतिक्रया आलेली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी