33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीय'ये दिल मांगे मोअर'... कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पाकिस्तानी सैन्याने घेतला होता...

‘ये दिल मांगे मोअर’… कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पाकिस्तानी सैन्याने घेतला होता धसका

कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या तोफखान्यावर ताबा मिळविल्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या तोंडी पहिले वाक्य होते ‘ये दिल मांगे मोअर…! कारगिल युद्धात पाकिस्तान विक्रम बत्रा यांना चांगलंच घाबरून होतं. त्याच्या नावाचा उल्लेखही करणं पाकिस्ताननं कटाक्षानं टाळलं. संपूर्ण भारत पाकिस्तान युद्धात शत्रू राष्ट्रानला त्याच्या कोडवर्डच्या नावाची धास्ती राहिली. हे कोड नाव होतं ‘शेरशाह’. कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या ‘शेरशाह’ नावाची धास्ती ते शहिद झाल्यानंतर देखील कायम टिकून आहे.

हिमाचल प्रदेशच्या पल्लारपूर शहरात राहणाऱ्या विक्रम बात्रा यांना कारगिल युद्धात वीरमरण आले. १९९९ सालच्या भारता पाकिस्तान युद्धात कॅप्टन विक्रम बात्रा यांनी शत्रू सैन्याशी निकराचा लढा दिला. बात्रा यांचा जन्म ७ सप्टेंबर १९७४ रोजी झाला. आज त्यांचा ४९ वा वाढदिवस. शत्रूशी निकराचा लढा देताना कारगिल जिल्ह्यातील पॉईंट ४८७५ येथे केप्टन विक्रम बात्रा यांना वीरमरण आले. विक्रम बात्रा आपल्या पालकांचा तिसरा मुलगा होता. वडील प्राध्यापक तर आई शिक्षिका. विक्रम आणि विशाल ही जुळी भावंडे होती. विक्रम पाहिला जन्मल्यानं सर्वांनी त्याचे नाव लव तर लहानग्या विशालचं नाव कुश ठेवलं.

विक्रम बात्रा यांना बालपणापासून सैन्यदलाचं आकर्षण होतं असं सांगितलं जातं. इंग्लिश विषयात एम. ए. च्या पहिल्या वर्षांतच शिक्षण अर्धवट सोडून बात्रा यांनी सैन्यात प्रवेश केला. जून १९९६ साली विक्रम बात्रा यांनी भारतीय सैन्य अकदामीत प्रवेश घेतला. ५ जून रोजी कारगिल युद्धाची ठिणगी पेटली. त्या अगोदरच काही महिन्यांपूर्वी बात्रा यांनी पालमपूरला कुटुंबियांना भेट दिली होती. त्याचवेळी विक्रम बात्रा आपल्या प्रेयसी डिंपल यांना भेटले. दोघांचेही एकमेकांवर निर्वाज्य प्रेम होते. आपल्या कुटूंबीयांना आपण शेवटचे भेटतो आहोत याबद्दल कदाचित त्यांना कल्पना असावी.

हे सुद्धा वाचा 
भाजपचा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मुलाला देणार टक्कर ?
खलिस्तानी अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी युके भारतासोबत!- ऋषी सुनक
भूमि पेडणेकरच्या थँक्यू फॉर कमिंग चित्रपटात मांडलेल्या ऑरगॅजम विषयाबाबत तुम्हाला माहिती आहे का?

युद्धाच्या प्रसंगी विक्रम बात्रा जम्मू काश्मीर रायफल्सच्या १३ व्या बटालियनमध्ये कॅप्टन या पदावर नियुक्त होते. युद्धादरम्यान एका पाकिस्तानी सैन्याने विक्रम बात्रा यांच्याकडे माधुरी दिक्षितची मागणी केली. तुम्ही माधुरी दीक्षित आम्हाला दिली तर आम्ही काश्मीर सोडू. शत्रूची मागणी ऐकताच विक्रम बात्रा यांनी त्याला गोळी मारून ठार केले. शत्रू मरण पावताच विक्रम यांनी फ्रॉम माधुरी विथ लव्ह असे उद्गार काढले.

आपल्या सैनिकाला शत्रूपासून वाचवतानाच विक्रम बात्रा यांना वयाच्या २४व्या वर्षी वीरमरण आले. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला भेटायला आल्यानंतर त्यांनी आपल्या देशप्रेमही व्यक्त केले. शत्रूसोबत लढताना एक तर तिरंग्यासोबत येईन किंवा तिरंग्यात गुंडाळून येईल. त्यांच्या त्याग्यासाठी भारत सरकारने मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र प्रदान केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी