27 C
Mumbai
Friday, September 8, 2023
घरराजकीयभाजपचा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मुलाला देणार टक्कर ?

भाजपचा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मुलाला देणार टक्कर ?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण लोकसभा मतदार संघात पराभूत करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने बैठका घेत योजना आखण्याचे काम सुरु केले आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत बिनसले असल्याचे बोलले जाते, कथोरे यांना ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जावू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

मातोश्रीवर नुकतीच कल्याण लोकसभा मतदार संघाबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कथोरे यांना कल्याणमधून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यात वितुष्ठ आल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे कथोरे यांना शिवसेना (ठाकरे गट) कडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत फ्री प्रेस जर्नलच्या वेबसाईटवर वृत्त देण्यात आले आहे.

दरम्यान कथोरे यांनी हे वृत्त नाकारले असून ठाकरे काय विचार करतात यावर आपण काही नियंत्रण ठेवू शकत नाही असे म्हणत आपण पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मागे कपिल पाटील यांचे निकटवर्तीय आणि भाजप ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांच्यावर कथोरे यांनी टीका केली होती.

हे सुद्धा वाचा 
खलिस्तानी अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी युके भारतासोबत!- ऋषी सुनक
भूमि पेडणेकरच्या थँक्यू फॉर कमिंग चित्रपटात मांडलेल्या ऑरगॅजम विषयाबाबत तुम्हाला माहिती आहे का?
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बनावट पनीरचा धंदा तेजीत!

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडवणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी देखील बैठक घेऊन राज्यातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबईतील नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये संभाव्य उमेदवार, पक्ष संघटनेकडून अपेक्षा, पक्ष बांधणी अशा विविध मुद्द्यावर भाजपमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी