28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयतीस्ता सेटलवाड यांना नियमीत जामीन; गुजरात उच्च न्यायालयाबद्दल काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

तीस्ता सेटलवाड यांना नियमीत जामीन; गुजरात उच्च न्यायालयाबद्दल काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

गोध्रा दंगलीच्या पुराव्यांशी कथित छे़डछाड प्रकरणात मानवाधिकार कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना आज सर्वोच्च न्यायालयाने नियमीत जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांना जामीन मंजूर करताना गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल विकृत आणि विरोधाभासी असल्याचे निरिक्षण यावेळी नोंदविले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई, ए.एस, बोपण्णा आणि दीपंकर दत्त यांनी हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांना जामीन मंजूर करतानाच त्यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्याचे देखील आदेश दिले आहेत. सेटलवाड यांनी दंगलीशी संबंधित साक्षिदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करु नये असे म्हटले असून त्यांचा पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात राहील असे देखील म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 

मुंबई पोलीस लावणार सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाचा छडा

अबू आझमींनी पुन्हा वंदे मातरम् वाद उकरून काढला; सभागृह 10 मिनिटासाठी तहकूब

अर्धेअधिक कोकण पाण्याखाली; नद्या दुथडी भरून वाहतातहेत, गावांचा संपर्क तुटला

गुजरात उच्च न्यायालयनाने तीस्ता सेटलवाड यांचा जामीन ना मंजूर केला होता. त्यांनी गुजरात पोलिसांना शरण जावे असे देखील कोर्टाने आदेशात म्हटले होते. त्यानंतर तातडीने तीस्ता सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन दिला होता. त्यानंतर ५ जुलै रोजी झालेल्या सुनावणीमध्ये १९ तारखेपर्यंत त्यांना अंतरिम जामीन देत दिलासा दिला होता. आज (दि. १९) रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांना नियमीत जामीन मंजूर केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी