28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रनितीन गडकरी म्हणाले, खडसेंसारख्या निष्ठावंतावर ही वेळ येणं दुर्दैव!

नितीन गडकरी म्हणाले, खडसेंसारख्या निष्ठावंतावर ही वेळ येणं दुर्दैव!

लय भारी टीम

मुंबई : भाजपमध्ये एकनाथ खडसे विरुध्द देवेंद्र फडणवीस गट असा जोरदार सामना रंगला आहे. खडसेंना विधानसभेनंतर विधान परिषदेतही उमेदवारी नाकारल्यामुळे खडसे संतप्त झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी खडसेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खडसेंच्या मदतीला धावून आले आहेत. खडसे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अशी वेळ येणं हे दुर्दैवी आहे,’ अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या नेहमीच्या पद्धतीनं या प्रकरणावर परखड मत मांडलं आहे. ‘खडसे यांच्यासोबत जे चाललंय ते दु:खद आणि दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र काम केलं आहे. पक्षाचा विस्तार करण्यात खडसे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अतिशय प्रतिकूल काळात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात त्यांनी मोठं काम केलं. पक्षाला यश मिळवून दिलं. आज त्यांना दिली जाणारी वागणूक दु:खद आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून इतकी वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर वा नेत्यावर ही वेळ येणं चांगलं नाही. त्याबद्दल मी फक्त दु:ख व्यक्त करू शकतो. त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही,’ असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

खडसे यांच्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे सर्व नेते नाराज आहेत. त्यामुळे भाजपामध्ये कोणत्याही क्षणी भूंकप होण्याची शक्यता आहे. खडसे यांचा विधानपरिषदेत पत्ता कापल्यानंतर खडसे प्रचंड आक्रमक झाले आहेत. खडसे कोणत्याही क्षणी भाजपातून बाहेर पडू शकतात असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत त्यामुळे खडसे विरुध्द भाजप असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. त्यामुळे भाजपामध्ये कोणत्याही क्षणी भूकंप घडू शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी