31 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रराजकीय डावपेचामुळे आत्मनिर्भर म्हणून घेणाऱ्या देशावर ही वेळ आली; शिवसेनेची मोदींवर खोचक...

राजकीय डावपेचामुळे आत्मनिर्भर म्हणून घेणाऱ्या देशावर ही वेळ आली; शिवसेनेची मोदींवर खोचक टीका

टीम लय भारी

मुंबई :-  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीवरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली आहे (Shiv Sena has sharply criticized Prime Minister Narendra Modi over the dire situation in the country).

गेल्या 10 दिवसांत भारतात 36 हजार 110 कोरोना बळी गेले. हे आकडे धडकी भरवणारे आहेत. अमेरिका, ब्राझिलला आपण मागे टाकले. हे चित्र बरे नाही. जगाला आता भारताची भीती वाटू लागली आहे. भारतात जाण्यापासून व्यापार-उद्योग करण्यापासून त्या देशांनी आपल्या लोकांना रोखले आहे. भारतात विमान आणि प्रवासबंदी केली. याचा आर्थिक फटका भारताला बसत आहे.

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत विराट-अनुष्काने उचललं मोठं पाऊल!

राहुल गांधीनी पंतप्रधान मोंदींना लिहिले पत्र, मांडला महत्त्वाचा मुद्दा

Readers’ comments on Arundhati Roy article: ‘If not Modi, who should be the next prime minister?’

भारतापासून जगाला धोका असल्याची चिंता आता युनिसेफनेही व्यक्त केली आहे. कोरोना ज्या वेगाने भारतात पसरत आहे त्यापासून संपूर्ण जग संकटात येईल. त्यामुळे भारताला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी मदत जास्तीत जास्त मदत करावी असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे.

राजकीय डावपेचामुळे आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या भारतावर ही वेळ आली असून सन्माननीय पंतप्रधान महोदय २० हजार कोटींचा महत्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात पंतप्रधानांचा नवा कोरा महाल असा या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे आणि त्याच देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या देशांकडून कोरोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत वाटू नये याचे आश्चर्य वाटते असे शिवसेनेने (Shiv Sena) म्हटले आहे.

शिवसेनेने (Shiv Sena) सामना या मुखपत्रातील अग्रलेखाद्वारे हा निशाणा साधला आहे. बांगलादेशने भारताला १० हजार रेमडेसिवीर वायल्स देणगी दाखल पाठवले. भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकासारखे देश ही आत्मनिर्भर भारताला मदतीचा हात पुढे करीत आहेत. स्पष्ट सांगायचे तर आजही भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर. नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते, असे अग्रलेखात म्हटले आहे.

भारतातील पेटलेल्या चितांचा धूर आजूबाजूच्या देशांना गुदमरून टाकत आहे. या धुरातून कोरोना आपल्या देशात पसरू नये यासाठी अनेक गरीब देश ही भारताला दयाबुद्धीने मदत करू लागले आहेत. कधीकाळी ही वेळ पाकिस्तान, रवांडा, कोंगोसारख्या देशांवर येत असे. आज राजकीय डावपेचामुळे आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या भारतावर आल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी