27.5 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमुंबईआयुक्त प्रवीण परदेशींच्या पीएच्या पत्नीकडूनही ‘वाडिया’ने उकळले महागडे शुल्क

आयुक्त प्रवीण परदेशींच्या पीएच्या पत्नीकडूनही ‘वाडिया’ने उकळले महागडे शुल्क

टीम लय भारी

मुंबई : मुंबई महापालिकेने अनुदानाची रक्कम थकविली म्हणून वाडिया रूग्णालयाने आकांडतांडव केले. पण हे रूग्णालय महापालिका व सरकारकडून अनुदान घेते, तरीही रूग्णांकडून महागडे शुल्क आकारते. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या पीएच्या पत्नीकडून या रूग्णालयाने भरमसाठ शुल्क आकारले. याबद्दल परदेशी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘वाडिया’चा वाद सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आयुक्त प्रवीण परदेशी यांनी वाडियाचा मनमानी कारभार निदर्शनास आणून दिला. या रूग्णालयाला जमीन सरकारने दिली. पाणी व इतर सुविधा महापालिका देत आहे. त्यांना भरमसाठ अनुदानही दिले जाते. असे असताना या रूग्णालयाने सवलतीच्या दरांत रूग्णांना सेवा दिली पाहीजे. पण हे रूग्णालय भरमसाठ शुल्क आकारते. सामान्य व्यक्ती असलेल्या माझ्या पीएची पत्नी रूग्णालयात दाखल होती. या कुटुंबाकडूनही महागडे शुल्क आकारले. वाडिया रूग्णालय सामान्य लोकांसाठी काहीही करत नाही, अशी नाराजीची भावना प्रवीण परदेशी यांनी या बैठकीत व्यक्त केली.

परदेशी यांची ही नाराजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही योग्य असल्याचे सांगितले. या बैठकीत वाडियाच्या व्यवस्थापनाचेही प्रतिनिधी होते. वाडियाच्या मनमानी कारभाराकडे यावेळी महापालिका व सरकारने लक्ष वेधले. त्यानंतर महापालिकेकडून २२ कोटी रूपये, तर राज्य सरकारकडून २४ कोटी रुपये थकीत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना बजावले, योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी