मुंबई

मुख्यमंत्र्याच्या गैरहजेरीत अदित्य ठाकरे करणार विमानतळावर मोदींच स्वागत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या लता मंगेशकर पुरस्काराचा मान मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

टीम लय भारी

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांना पहिल्या लता मंगेशकर पुरस्काराचा मान मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. (Prime Minister Narendra Modi attend the first Lata Deenanath Mangeshkar Award in Mumbai)

मुख्यमंत्र्याच्या गैरहजेरीत अदित्य ठाकरे करणार विमानतळावर मोदींच स्वागत

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींचे (Prime Minister Narendra Modi) स्वागत करण्यासाठी विमानतळावर जाणार नसल्याची महिती मिळाली आहे. परंतू नियमानुसार पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यंमत्री जाणे अपेक्षित होते. मात्र ते जाणार नसल्याची माहिती पुढे आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

इतकेच नव्हे तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विमानतळावर नरेंद्र मोदींच्या स्वागताला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याऐवजी उद्योगमंत्री सुभाष देसाई करणार पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जाणार आहेत. राज्यातील घडामोडी पाहता मोदी सरकार (Prime Minister Narendra Modi)  व ठाकरे सरकारच्यातील अंतर वाढल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्यानं कारवाया सुरू आहेत. त्यावरून शिवसेना आणि भाजपचे संबंध बिघडले आहेत. कधीकाळी मित्र असलेले दोन पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू बनले (Prime Minister Narendra Modi) आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं आजच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा :- 

J&K visit UPDATES: Democracy has reached grassroot level in Jammu and Kashmir, says PM Narendra Modi

राणा दांपत्याचा नाहक हट्ट, शिवसैनिक धडा शिकविण्याच्या तयारीत!

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close