28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रराऊतसाहेब, म्हणूनच तुम्ही ते ट्वीट रिट्विट केलंत ना?; भाजपचा राऊतांना खोचक टोला

राऊतसाहेब, म्हणूनच तुम्ही ते ट्वीट रिट्विट केलंत ना?; भाजपचा राऊतांना खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- संजय राऊत यांनी आज एक रीट्वीट केलेले आहे तेच रीट्वीट चर्चेत आले आहे. राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांकडे लक्ष ठेवूनच असतात. एखादा मुद्दा हाताला लागला की, पकडलंच कैचीत. खासदार संजय राऊत यांनी रिट्विट केले. मराठी भाषेच्या मुद्द्यावर असलेल्या याच ट्विटवर बोट ठेवत भाजपाने राऊतांना कैचीत पकडले. राऊतसाहेब, म्हणूनच तुम्ही ते ट्वीट रिट्विट केलंत ना? भाजपचा राऊतांना खोचक टोला लगावला (Rautsaheb, that’s why you retweeted that tweet, right? The BJP hit Raut hard).

प्रचंड गोंधळानंतर राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकची अधिसूचना काढली. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण केले जात असा मुद्दा उपस्थित करत पत्रकार प्रशांत कदम यांनी राज्य सरकारच्या इंग्रजीतील अधिसूचनेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. हेच ट्वीट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रिट्विट केले. राऊतांनी ट्वीट रिट्विट केल्यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यावरून संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला.

या कारणामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल : नवाब मलिक

संजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet मुळे राजकीय वर्तुळात चर्चा

Trinamool Congress appoints MP Abhishek Banerjee as general secretary

“संजय राऊतजी (Sanjay Raut), असत्याचे ओझे तुम्हालाही डोईजड झाले आहे ना? आधी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याच्या तुमच्या मतास ठाकरे सरकारने पाने पुसली. आता शिवसेनेचा मराठी बाणा खुंटीवर टांगला. संजय राऊत (Sanjay Raut) साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा. तसेही, पत्रकार की खासदार या संभ्रमातच तुम्ही अडकलेले आहात. त्यात आता नवी भर. मराठीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ठाकरे सरकारला रोखठोक सवाल करायला पत्रकाराचा बाणा लागतो. तुमच्या भावना प्रशांत कदम यांनी मांडल्या म्हणून रिट्विट केले ना?,” असे म्हणत उपाध्ये यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) लक्ष्य केले.

संजय राऊतांनी रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये काय म्हटले?

“सामान्य दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नाहीत, तर त्यांना बडवणार. मराठी मराठी करत मतेही मागणार. पण महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची सरकारी नियमावली दरवेळी इंग्रजीमध्येच. संपूर्ण कोरोना काळात हे कायम घडत आल आहे. सरकारच्या कामात सुटसुटीत मराठीला प्राधान्य का नाही?,” असा मुद्दा पत्रकार प्रशांत कदम यांनी ट्विट करून उपस्थित केला. हेच ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी