28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयया कारणामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल : नवाब मलिक

या कारणामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल : नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप पक्ष अनेक मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था (Economy) मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे (Nawab Malik has said that if the country economy fails to measure, then the country economy will collapse completely).

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशाचा जीडीपी 7.5 टक्के मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देता. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था (Economy) कशी चालणार आहे? असा सवालही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. रिझर्व्ह बॅंकेने कबूल केले आहे हे चांगले आहे परंतु आकलन चुकत असेल तर हे देशासाठी सारखे सारखे चांगले राहणार नाही, असे ही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो!

संजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet मुळे राजकीय वर्तुळात चर्चा

Covid-19: India opposes ‘vaccine passport’, health minister calls it ‘discriminatory’

निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट नको

यावेळी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात 12 कोटी, डिसेंबरपर्यंत 210 कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे, असा सवाल नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला.

लस किती मिळणार जाहीर करा

राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार याची माहिती दिली पाहिजे. केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. कधी प्रकाश जावडेकर वेगळे बोलतात तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला.

सत्यता देशासमोर ठेवा

12 कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता परंतु आजपर्यंत किती पुरवठा झाला असा सवाल करतानाच कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी (Nawab Malik) केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी