28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet मुळे राजकीय वर्तुळात चर्चा

संजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet मुळे राजकीय वर्तुळात चर्चा

टीम लय भारी

मुंबई :- संजय राऊत यांनी आज एक रीट्वीट केलेले आहे ते रीट्वीट चर्चेत आले आहे. मूळ ट्वीटमध्ये राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात काढलेली अधिसूचना मराठीत नसून इंग्रजीत का आहे? असा आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकाच्या काराभारात सुटसुटीत मराठी असण्यासंदर्भातला मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, हेच ट्वीट संजय राऊत यांनी रीट्वीट केल्यामुळे त्यांनी आपल्याच सरकारला या रीट्वीटच्या माध्यामातून कानपिचक्या दिल्याचे तर्क राजकीय वर्तुळात काढले जात आहेत (Arguments are being made in political circles that Sanjay Raut has retweeted his own government through this retweet).

राज्यात नुकतेच ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत राज्यातले लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातली नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. ही नियमावली पूर्णपणे इंग्रजी भाषेत आहे. यावरुन सरकारवर (Government) टीका करत एबीपी माझाचे पत्रकार प्रशांत कदम यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सामान्य दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर त्यांना बडवणार, मराठी मराठी करत मते ही मागणार, पण महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची सरकारी नियमावली दरवेळी इंग्रजीमध्येच… संपूर्ण कोरोना काळात हे कायम घडत आलंय… सरकारच्या कामात सुटसुटीत मराठीला प्राधान्य का नाही?”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पूनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस : अशोक चव्हाण

‘म्युकरमायकोसिस’ बाबत प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

Coronavirus: Tamil Nadu extends lockdown till June 14, but with relaxations

राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने (Government) अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. परंतु, हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सरकारने (Government) म्हटले होते. त्यावरून बराच गोंधळ उडाला. तसेच सरकारमध्येच (Government) ताळमेळ नसल्याची टीकाही झाली.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ केला जाणार असल्याची घोषणा केली होती. कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असेल आणि किती प्रमाणात निर्बंध हटवले जातील, यासाठीचे निकष निश्चित करण्यात आल्याचे ही वडेट्टीवार म्हणाले होते. परंतु, त्यांच्या घोषणेनंतर असा निर्णय झाला नसल्याचे सरकारने (Government) म्हटले होते. हा प्रस्ताव विचारधीन असल्याचे सांगत सरकारने अनलॉकबद्दलची चर्चा थांबवली. पण, या गोंधळावरून सरकार टीकेचे धनी ठरले. अखेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून (Government) अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी