27 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयआमदार रोहित पवारांनी निर्मला सितारामण यांची घेतली भेट

आमदार रोहित पवारांनी निर्मला सितारामण यांची घेतली भेट

टीम लय भारी

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची भेट घेतली आहे. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी रोहित पवार यांनी ही भेट घेतली आहे.आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांनी सितारामन यांच्याकडे प्रस्ताव मांडला आहे (Rohit Pawar meets Nirmala Sitharaman).

कर्जत-जामखेड तालुक्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरु करावा असा प्रस्थाव देखील पवार यांनी यावेळी मांडला. त्याचबरोबर आपल्या मतदार संघात बँकांच्या संख्या कमी आहेत.

Rohit Pawar : आ. रोहित पवारांकडून PM मोदींच्या ‘या’ निर्णयाच स्वागत, केली ‘ही’ विनंती

Rohit Pawar : रोहित पवारांची मतदारसंघासाठी ‘स्मार्ट’ योजना

त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे येथील राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने आर्थिक मदत मिळावे असा प्रस्ताव रोहित पवार यांनी मांडला.

MLA Rohit Pawar : डोळ्यात पाणीच येणार, चिमुकलीने आमदार रोहित पवारांशी साधलेला संवाद नक्की ऐका

Local body polls in Maharashtra: NCP to project Chhagan Bhujbal to counter BJP’s strategy to win over OBCs

शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबवण्याची हमी सीतारामन यांनी रोहित पवार यांना दिली आहे. तसेच मतदार संघातील आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी नवीन बँकांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सीतारामन म्हणाल्या असल्याचे रोहित पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी