29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईपवई पोलिस स्थानकाच्या सभागृहाची रोटरी क्लबने केली दुरुस्ती

पवई पोलिस स्थानकाच्या सभागृहाची रोटरी क्लबने केली दुरुस्ती

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : रोटरी क्लब ऑफ मुंबईचे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ राजेंद्र अगरवाल यांच्या पुढाकाराने रोटरीच्या माध्यमातून  पवई पोलीस ठाण्यातील जीर्ण अवस्थेत असलेल्या सभागृहाची  दुरुस्ती आणि सुशोभीकरण करून पोलिसांना त्याचा योग्य वापर करता यावा यासाठी अत्याधुनिक सभागृह बनवले.(Rotary Club repaired the hall of Powai Police Station)

या सभागृहाचे उद्घाटन मुंबईचे पोलीस उपायुक्त डॉ.महेश्वर रेड्डी, रोटरी क्लबचे जिल्हा गव्हर्नर डॉ राजेंद्र अग्रवाल, रोटरी  क्लब पवईच्या अध्यक्ष निमिष अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

आम्ही नेहमीच समाजातील लोकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदत करत असतो. त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय या मध्ये आम्ही एक खारीचा वाटा उचलत असतो. त्याचंच एक भाग म्हणून या पोलिस स्थानकातील सभागृह अत्यंत खराब अवस्थेत असल्याची आम्हाला माहिती त्यानुसार आम्ही हे सभागृह दुरुस्ती करून दिले.

हे सुद्धा वाचा

अभाविप मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन

विक्रोळी पार्क साइट पोलीस स्टेशन मध्ये महिलांना बेकायदेशीरित्या अटक करून मारहाण करणाऱ्या त्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे

Police : राज्यातील 495 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (API) बदलीं रद्द

Wankhede questioned for 9 hours at Kopri police station in Thane

पोलिसांचे सभागृह हे अगदी अत्याधुनिक असले पाहिजे ते नेहमीच समाजाला आपली चांगली सेवा देत असतात. त्याचे काम करणे हे मी माझे भाग्य समजतो अशी माहिती रोटरी क्लब ऑफ मुंबईचे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ राजेंद्र अगरवाल यांनी दिली. या समारंभात दीपक दर्यानी, संजय तिवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत, पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्यासह क्लबचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी