31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयमनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा पार पडणार मुंबईबाहेर

मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा पार पडणार मुंबईबाहेर

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरे यांनी  सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय.(MNS anniversary celebrations will be held outside Mumbai this year)

राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांसाठी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या बैठका घेतल्या आहेत.

राज ठाकरे मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. तर, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक देखील आयोजित केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च या दिवशी करण्यात आली होती. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा हा होईल.

सर्व राज्यातील मनसैनिक या वर्धापन दिनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात उपस्थित असणार आहेत. या दरम्यान राज ठाकरेंचं लक्ष महापालिका निवडणूक पालिकेकडे देखील लागले आहे. कारण मुंबईसोबत मनसेनं यावेळी ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांवर देखील लक्ष केंद्रीत केलेलं दिसून येतंय.

हे सुद्धा वाचा

मनसे नेते संदीप देशपांडे संतापले, शिवसेनेच्या दुटप्पीपणाचा केला निषेध

एकनाथ शिंदेंचा टोला, आता होणार काम, आता खरा राजूशेठ यांना लावावा लागणार बॅनर!

मनसेकडून लता मंगेशकरांच्या स्मारकाबाबत पहिली प्रतिक्रिया

How Raj Thackeray and his MNS are planning to resurrect themselves in ‘do-or-die’ BMC polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी