30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeटॉप न्यूजरॉयल इनफिल्डच्या 650 TWins चे लिमिटेड एडिशन!

रॉयल इनफिल्डच्या 650 TWins चे लिमिटेड एडिशन!

टीम लय भारी

रॉयल इनफिल्ड म्हटलं की तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रॉयल इनफिल्ड चालवण्यासाठी उत्सुकता कायम असते. कंपनीनं नुकतीच १२० वर्षे पूर्ण केली आहेत. या वर्षाचं औचित्य साधत कंपनीने लोकप्रिय 650 ट्विन मोटरसायकल्स – इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल GT 650 ची १२० व्या वर्धापनदिनी मॉडेल सादर केलं आहे(Royal Enfield: Limited edition of 650 Twins)

बाइक्स EICMA 2021 (मिलान मोटरसायकल शो) मध्ये सादर करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या लिमिटेड एडिशन बाईकच्या फक्त ४८० युनिट्स असतील. या मोटारसायकल भारत, युरोप, अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये विकल्या जाणार आहेत.

Aarya 2: आर्या२ चं मोशन पोस्टर आउट

पहिले ते चौथीचे वर्ग लवकरच सुरु होणार!

भारतात दोन्ही मोटारसायकलचे एकूण १२० युनिट्स खरेदी करता येतील. भारतात ६ डिसेंबर २०२१ रोजी कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध असतील. केवळ मर्यादित काळासाठी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असतील.

या मोटारसायकल खरेदी करू इच्छिणारे ग्राहक २४ नोव्हेंबरपासून वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. विक्री प्रक्रियेचे तपशील थेट नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर शेअर केले जातील.

आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य

Royal Enfield SG 650 Concept unveiled at EICMA 2021. See details

मॉडेल खास बनवण्यासाठी यूके आणि भारतीय टीमने डिझाइन आणि हँडक्राफ्ट केलं आहे. मोटारसायकल यूनिक असून रिच ब्लॅक क्रोम टँक आहे. ही टाकी चेन्नईतील रॉयल इनफिल्डच्या उत्पादन प्रकल्पात विकसित करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मोटारसायकलचे भाग पूर्णपणे काळे करण्यात आले आहेत. इंजिन, सायलेन्सर आणि इतर घटक काळ्या रंगात रंगवले आहेत.

मोटारसायकलमध्ये फ्लायस्क्रीन, इंजिन गार्ड, हील गार्ड, टूरिंग आणि बार अँड मिरर यांसारख्या अ‍ॅक्सेसरीज आहेत. यात हँडक्राफ्टेड टँक बॅजिंग देखील मिळते. प्रत्येक मोटरसायकल खास बनवण्यासाठी, टँक टॉप बॅजमध्ये मोटरसायकलचा युनिक नंबर देखील असेल.

रॉयल इनफील्ड 650 ट्विन लिमिटेड एडिशनच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात कोणताही बदल केलेला नाही. यात पूर्वीसारखेच ६४८ सीसी पॅरलल-ट्विन इंजिन मिळेल, जे ४७ बीपीएच आणि ५२ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी