राजकीय

आता महागाई कमी करण्याच्या घोषणेची वाट बघतोय : ऋता आव्हाड

गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढत असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे.

टीम लय भारी

ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढत असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे.
याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर आक्रमक झाली असून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे -पालघर विभागाध्यक्षा ऋता जितेंद्र (Ruta Awhad) आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. (Ruta Awhad said the announcement to reduce inflation)

आता महागाई कमी करण्याच्या घोषणेची वाट बघतोय : ऋता आव्हाड

दरम्यान, प्रत्येक निवडणुकीत नवीन घोषणा केल्या जात आहेत. मात्र, महागाई कमी होत नाही. आता महागाई कमी कधी होणार ह्यांची घोषणा कधी करत्यात याची आम्ही वाट बघतोय, अशी टीका ऋताताई आव्हाड (Ruta Awhad) यांनी केली. आधीच लॉकडाउननंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरात देखील चांगलीच वाढ केली आहे.

सिलिंडर महागल्याने गृहिणीचे (Ruta Awhad) आर्थिक बजेट कोलमडले आहे.त्यामुळेच इंधन व स्वयंपाक गॅसची दरवाढ कमी करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महागाईचा भस्मासूर, पगार कपात, नोकरी, जाण्याची भीती, त्यात सतत पेट्रोल डिझेलची दरवाढ, स्वस्त झाले मरण आणि महागले पेट्रोल आदी फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

यावेळी ऋताताई आव्हाड म्हणाल्या की, उज्वला योजनेमध्ये (Ruta Awhad) जेवढ्या लोकांना सबसिडी मिळाल्या. ते सगळेच आता चुलीवर स्वयंपाक करू लागले आहेत. लोकप्रियता मिळवण्यासाठी स्वप्नरंजन करणाऱ्या घोषणा करण्याची सवय या लोकांना लागली आहे. प्रत्येक निवडणुकीत नवीन घोषणा केल्या जात आहेत. मात्र, महागाई कमी होत नाही.

‘आता महागाई कमी होणार,” ह्यांची घोषणा कधी करतात, याची आम्ही वाट बघतोय. या महागाईमुळे आणि कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आता कुठे थोडे थोडे ४०% ते 50% टक्के रोजगार चालु झाले आहेत. ब-याचश्या कंपन्या बंद पडल्या आहेत. ब-याचश्या छोट्या छोट्या उद्योगांना प्रचंड फटके बसले आहेत. मुलांच्या शाळेची फी भरायला पालकांची ऐपत नाही. मुलांना शिक्षण कसे द्यायचे, त्यांचा आजारपणाची बिल कशी भरायची, असा प्रश्न पालकांसमोर (Ruta Awhad) आहे. या सगळ्या गोष्टींचा महागाईचा परिणाम निव्वळ खाण्या पिण्यावर नाही तर सबंध जीवनावर झाला आहे. त्यामुळेच भाजप सरकारचा बुरखा फाडण्यासाठी हे आंदोलन केले आहे, असे सांगितले.

हे सुद्धा वाचा :- 

Maha: NCP seeks action over `Godse for Baramati’s Gandhi’ tweet

फेसबुकला जन्म देणाऱ्याचा आज जन्म दिवस

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close